आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरे बाप रे बाप. तो बघा झाडावर कसा लपलाय साप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कॉलेजरोडजवळील बॉइज टाउन शाळेशेजारच्या रस्त्यावर दुपारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. काही तरुणांचे अचानक एका झाडाकडे लक्ष जाते. या झाडावर साप चढत असल्याचे त्यांना दिसते. काही वेळातच साप बघण्यासाठी गर्दी जमते आणि दोन तास रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतो.
कॉलेजरोडवरून त्र्यंबकरोडकडे जाण्यासाठी बॉइज टाउन शाळेजवळ रस्ता आहे. या रस्त्याजवळील एका झाडावर शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास साप झाडावर चढत असताना काही तरुणांना दिसला. तो बघताच तरुण जागीच थबकले आणि परिसरात एकच ड्रामा सुरू झाला. झाडाच्या फांद्यांमुळे साप दिसत नव्हता. त्यामुळे उपस्थितांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. काही वेळात काही तरुणांनी आरडाओरड सुरू केली. या वेळी सापाने हालचाल केल्यामुळे पुन्हा एकदा लोक सावध झाले. तब्बल दोन तास हा खेळ सुरू होता. अखेर उपस्थितांपैकी बहुसंख्य नागरिकांनी काढता पाय घेतला. थोडीफार शांतता झाल्यानंतर साप जमिनीवर उतरून निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.