आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनाला सलामी सामाजिक उपक्रमांतून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, यावर्षी अनेक संस्थांनी पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘ग्रीन कुंभ’ उपक्रमास त्यानिमित्त हातभार लागला आहे; तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरांचेही आयोजन करत शहरवासीयांनी अनोखी सलामी दिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ग्रीन गोदा सायकल रॅलीत स्वत:च्या आरोग्यसाठी समजाच्या स्वास्थ्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी सायकल चालवण्याचा संकल्प करण्यात आला. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनीही सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
पंचवटी पोलिस ठाणे आणि सुयोग हॉस्पिटलतर्फे ही रॅली पार पडली. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवत सुरुवात झाली. काही अंतर सरंगल यांनी सायकल चालविली. पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे, नरेंद्र पिंगळे, यांच्यासह शालिनी पवार, अरुण पवार, तुषार जगताप रॅलीत सहभागी झाले होते.

विभागीय कार्यालयात शहिदांना अभिवादन
येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. राष्टÑासाठी शहीद झालेल्यांना या वेळी अभिवादन करण्यात आले. या वेळी पूर्व माध्यमिक, माध्यमिक, राष्‍ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थी, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती विकास व सुधारणा अभियानांतर्गत पुरस्कारांचे पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते वितरण झाले. पुरस्कारांमध्ये हताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रशांत खैरनार, जयेश निकम, सिडको बालविकास मंदिर, नाशिकचे सचिन कदम, कृष्णा जाधव, हृतिक शेवाळे यांचा समावेश होता. याप्रसंगी आमदार बबन घोलप, जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, जिल्हाधिकारी विलास पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर उपस्थित होते.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे ध्वजवंदन
करन्सी नोट प्रेस येथे स्वातंत्र्य दिन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल महाप्रबंधक संदीप जैन यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. दलातर्फे सलामी देण्यात आली. या वेळी कर्मचारी अधिकारी, कर्मचारी- मजदूर संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.