आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Change Election Reference Dr.Ujjwala Barve

सोशल मीडियाच्या प्रभावाने बदलले निवडणुकांचे संदर्भ- डॉ. उज्ज्वला बर्वे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्रामपंचायतींपासून लोकसभेच्या निवडणुकांतही मतदारांवर प्रभाव टाकणारे पारंपरिक संदर्भ आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रभावहीन ठरू लागले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, टि्वटर, यूट्यूब या माध्यमांचा प्रभावी वापर करून जनमत आकर्षित करत निवडणुका जिंकता येत असल्याचे निष्कर्ष लोकसभा अन् त्यापाठोपाठ पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूक निकालांनी दाखवून दिले. त्यामुळे माध्यमे अधिक सोशल झाल्याने निवडणुकीतील संदर्भ बदलत चालल्याचे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्राध्यापिका डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने केटीएचएम महाविद्यालयाच्या पत्रकारिता, राज्यशास्त्र मानसशास्त्र विभाग यांच्या वतीने "मानसशास्त्रीय प्रभाव निवडणुका माध्यम' या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. बर्वे बोलत होत्या. याप्रसंगी मविप्र समाज संस्थेचे संचालक मुरलीधर पाटील, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, उपप्राचार्या डॉ. स्नेहल सोनवणे यांसह समन्वयक प्रा. प्राची पिसोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडणुकांत नेत्यांबरोबर मतदारही आपली भूमिका बदलतात. स्वातंत्र्य हे समाजाने समाजाला देणारी प्रक्रिया असल्याचे श्रीमंत माने यांनी सांगितले.

लोकशाही प्रक्रियेत निवडणुकांमधून होणारा मानसशास्रीय अभ्यास या संदर्भात संशोधकांना नवे परिमाण मांडण्याची संधी देणारा निवडणूक प्रक्रियेत घडणाऱ्या गोष्टींचा मानसशास्रीय अंगाने अभ्यास करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या वेळी प्रा. डॉ. कल्पना अहिरे, रुबी पवार, योगेशकुमार होले, गोकुळ सानप, भूषण कोरडे, सुवर्णा धामणे यांनी परिश्रम घेतले.

मतदारांचा कौलही अनपेक्षित
निवडणुकांमध्येप्रतिमा निर्मितीसाठी प्रभावी जाहिरात राजकीय पक्षांनी राबवली. त्यामुळे पारंपरिक संदर्भातील धर्म, जात, पैसा हे घटक प्रभावहीन ठरू लागले असून, सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्याने मतदारांचा कौलही प्रत्येक निवडणुकीमध्ये अनपेक्षित येऊ लागला असल्याचे बर्वे यांनी नमूद केले.