आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात भाजपचे क्लिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडिया सेल सक्रिय केला आहे. याअंर्तगतच नाशिक महानगर व ग्रामीण भागात 150 प्रमुख कार्यकर्त्यांच्या मदतीने जवळपास दहा हजार कार्यकर्त्यांचा ग्रुप कनेक्ट केला जात असून, स्वतंत्र पेज तयार करण्याचे कामही सुरू आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत पक्षाला मिळालेले यश देशभरात पोहोचविण्यासाठी पक्षाकडून सोशल मीडियाचा जोरदार वापर केला जात आहे. त्यातच केंद्रातील कॉँग्रेस सरकारच्या विविध योजनांमध्ये झालेला भ्रष्टाचारही याच माध्यमातून जनतेसमोर आणला जात आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी कॉँग्रेस पक्षानेही सोशल मीडियाचे जाळे देशभर विणण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेत आता भाजपने केवळ मोठय़ा शहरांमधील सुशिक्षित मतदार डोळ्यासमोर न ठेवता ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत सोशल मीडियामार्फत पोहोचण्यासाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच नाशकात पार पडले
स्वतंत्र पेज लवकरच
शहर व जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा ग्रुप तयार होत आहे. पक्षाचे स्वतंत्र पेजही तयार केले जात आहे. येत्या पंधरा दिवसांत पेजचे काम होऊन दररोज प्रत्येक घटना, मोदींच्या जाहीर सभेचे वृत्त, लोकसभा उमेदवारांची यादी टाकली जाणार आहे. कमी वेळात, कमी खर्चात, चोवीस तास सुशिक्षित मतदार जोडण्यासाठी या माध्यमाचा उपयोग होणार आहे. कोणत्याही पक्षावर अथवा व्यक्तिगत टीका, धार्मिक भावना दुखावला जाणारा मजकूर प्रसिद्ध केला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. नितीन शुक्ला, महानगर संयोजक