आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भविष्य निर्वाह निधीच्या योजना सोशल मीडियावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ज्या उद्योजकांच्या आस्थापनेला भविष्य निर्वाह निधी कायदा लागू आहे, अशा प्रत्येक उद्योजकाने त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. नाशिक येथील उपक्षेत्रीय कार्यालयात फेसबुक व व्हॉट्सअँप या सोशल मीडियावर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध असून, उद्योजकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भविष्य निधीचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले.आयमा येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. एप्रिल 2012 नंतर संगणकीकरणामुळे भविष्य निर्वाह निधी संगटनात झालेल्या नवीन बदलांची माहिती देण्यासाठी आयमा येथे आयोजित चर्चासत्रात सहायक आयुक्त हेमंत राऊत, अंमलबजावणी अधिकारी नंदकुमार बकरे, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, राजेंद्र आहिरे, सौमित्र जोशी, सुरेश माळी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सौमित्र जोशी यांनी प्रास्ताविक केले.
अंमलबजावणी अधिकार्‍यांनी तपासणी करण्यासाठी येण्यापूर्वी उद्योजकांना पूर्वकल्पना द्यावी, प्रशासकीय दरात कपात करावी, अशी मागणी आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी करतानाच उद्योजकांच्या वतीने विविध मुद्दे मांडले.सहायक आयुक्त राऊत यांनी चलचित्राव्दारे नियोजनाचे नोंदणीकरण, नियोजनाच्या संगणकीकरण स्वाक्षरी, कंपनीतील कर्मचार्‍यांची माहिती अद्ययावत करणे याबाबत माहिती दिली. संगणकीकरणामुळे मालकवर्गांकडून अपेक्षित असलेल्या कामांची सविस्तर माहिती आयुक्त तांबे यांनी उद्योजकांना दिली. त्याचप्रमाणे अधिकृत अधिकार्‍याच्या सहीचा दस्तावेज 30 जूनपर्यंत नोंदणी करावा, असे आवाहन त्यांनी केले. राजेंद्र आहिरे यांनी आभार मानले.