आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंग फोरम लावणार ३००० वृक्ष, बोटॅनिकल गार्डनच्या विकासाचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यभरात सुरू असलेल्या हरित क्रांतीत सहयोग म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमनेही योगदान देण्याचे ठरवले होते. याच अनुषंगाने मे महिन्यात महापालिकेला जागा उपलब्ध करून देण्याची विनंती फाेरमने केली होती. या प्रयत्नांना यश अाले असून, पालिकेने म्हसरूळ परिसरातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागे सहा एकर जागा फोरमला वृक्षसंवर्धनासाठी उपलब्ध करून दिली आहे.
या जागेवर तीन हजार वृक्ष लावण्याचे नियोजन असून, खड्डे खोदण्याच्या कामाचा शुभारंभ फोरमचे मार्गदर्शक पालिका अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते झाला. चार दिवसांत हे खड्डे खाेदण्याचे काम संपणार असून, पाऊस पडल्यावर प्रत्यक्ष वृक्षारोपण सुरू हाेणार अाहे. केवळ झाड लावता येथे वनस्पती उद्यान विकसित होईल, असे नियाेजन अाहे. नाशिकपासून किमीवरील या जागेत भविष्यात थीम पार्क तयार करण्याचाही उद्देश आहे. या कामासाठी आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, अनिल चव्हाण आणि राहुल खांदवे यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे फाेरमने सांगितले.

यांच्या संकल्पनेतून साकारताेय उपक्रम : प्रमोदगायकवाड, डॉ. संदीप अहिरे, डॉ. पंकज भदाणे, इंजि. प्रशांत बच्छाव, डॉ. म्हसदे, अॅड. गुलाब आहेर, डॉ. अॅड. संदीप आवारे, रामदास शिंदे, डॉ. उत्तम फरतळे, वैभव उपासनी, अॅड. बापू निकम, डॉ. आशिष चौरसिया.

नाशिककरांचा सहयाेग महत्त्वाचा
^या उपक्रमासाठी नाशिककरांच्या आार्थिक श्रमदानाच्या माध्यमातून सहयोग अपेक्षित आहे. पुढील संगोपनासाठी काही प्रायोजकांनी मदतीचा हात दिल्यास हा उपक्रम यशस्वी करणे सोपे हाेणार अाहे. - प्रमाेद गायकवाड, अध्यक्ष,साेशल नेटवर्किंग फाेरम
बातम्या आणखी आहेत...