आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Aadarch Coach Help To Hailstorm Victim At Nashik, Divya Marathi

‘आदर्श कोच’चे गारपीटग्रस्तांना एक लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- आदर्श कोचचा दर्जाप्राप्त व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने दखल घेतलेल्या पंचवटी एक्सप्रेसच्या सी-3 कोचच्या वर्धापनदिनाचा खर्च यंदा टाळून राज्यातील गारपीटग्रस्तांना एक लाख 1111 रुपयांची मदत देण्याचा निर्णय रेल परिषदेने घेतल्याची माहिती अध्यक्ष बिपीन गांधी यांनी दिली. कोचचा सातवा वर्धापनदिन शुक्रवारी (दि. 28) असून, त्यासाठी दरवर्षी होणारा खर्च न करता शेतकर्‍यांना मदत देण्याचे ठरवण्यात आले आहे.
या वातानुकूलित डब्यातून रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांनी सात वर्षांपासून आदर्श कोच होण्यासाठी अनेक प्रयत्न केले, तसेच विविध उपक्रमही राबवले. कोचमध्ये स्वच्छतेसह शांत वातावरणात प्रवास होण्यासाठी इगतपुरी स्थानकापुढे प्रवाशांचे मोबाइल बंद ठेवणे, कोचमध्ये खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्रेत्यांना बंदीचे नियम लागू करण्यात आले. तसेच, वेळोवेळी आगळेवेगळे उपक्रमही राबवण्यात आले. प्रवाशांच्या वाढदिवसासह, अनेकांच्या लग्नाचे वाढदिवसही या कोचमध्ये साजरे करण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सात वर्षांपूर्वी 28 मार्चला ‘आदर्श कोच’ असा दर्जा दिला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही याची दखल घेतली. त्यानंतर दरवर्षी वर्धापनदिन थाटात साजरा करण्यात येऊ लागला. मात्र, दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून नाशिकरोड-इगतपुरी प्रवासादरम्यान सकाळी आणि मुंबई येथे सायंकाळी साधेपणाने कार्यक्रम साजरा करून होणारी बचत शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.