आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Design Cleaning Important For Business A.P. Bohra, Divya Marathi

‘डिझायनिंग क्लिनिक’ उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण -ए. पी. बेहरा यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशादायी । नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये झाला योजनेला प्रारंभ
सुक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योग विकासासाठी डिझाइन पद्धत अतिशय उपयुक्त असून, त्यातून सर्जनशीलता, दर्जा आणि मूल्यांकनालादेखील वाव मिळतो. या पद्धतीशी संबंधित डिझायनिंग क्लिनिक योजना उद्योग क्षेत्राच्या विकासातील अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन डिझाइनतज्ज्ञ ए. पी. बेहरा यांनी केले. ‘डिझायनिंग अवेरनेस’ विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये केंद्र सरकारच्या ‘डिझायनिंग क्लिनिक’ योजनेस प्रारंभ झाला. यानिमित्ताने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आणि अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन यांच्या संयुक्त विद्यमाने लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांच्या चालकांसाठी ‘डिझायनिंग अवेरनेस’ ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बेहरा बोलत होते. ते म्हणाले, डिझाइनमुळे नावीन्यपूूर्ण, प्रभावकारी व दीर्घकाळ टिकणारे निकाल मिळण्यास मदत होते. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी डिझायनिंग क्लिनिकचा ऑटोमोटिव्ह, स्ट्रक्चर्स, गारमेंट्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि रोबोटिक पद्धतीने चालणार्‍या उद्योगांमध्ये उपयोग होतो. क्लस्टरचे उपाध्यक्ष के. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यशाळेत शंभराहून अधिक उद्योजक, विद्यार्थी सहभागी झाले.
काय आहे डिझायनिंग क्लिनिक योजना?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे फिल्ड एक्झिक्युटिव्ह कुमार परमार यांनी डिझाइन क्लिनिक योजनेची माहिती देताना सांगितले, लघु, मध्यम किंवा सूक्ष्म उद्योगांना स्पर्धेच्या युगात त्यांच्या सध्याच्या किंवा नव्या उत्पादनाचे डिझाइन, मार्केटिंग, तंत्रज्ञान या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी बॅँकेकडून आर्थिक, तर खासगी एजन्सीकडून उत्पादन डिझाइन, विकास व ब्रॅँडिंगसाठी मदत घ्यावी लागते, जी खर्चिक असते. नव्याने सुरू झालेल्या ‘डिझायनिंग क्लिनिक’मुळे ही सुविधा एकाच छताखाली व शासनाच्या मदतीने उपलब्ध होईल. त्यासाठी एकूण प्रकल्पाच्या 10 ते 15 टक्के खर्च उद्योगांना करावा लागणार असून, 80 टक्के खर्चाची बचत शक्य होणार आहे
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
रोहन पटवा व स्नेहल जोशी यांनी केस स्टडीज सादर करताना विविध क्षेत्रात डिझाइनचा उपयोग कसा होऊ शकतो, हे स्पष्ट केले. ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांमध्ये रोबोटिक्स तंत्राचा उपयोग याविषयी पार्थ आणि सौमित्र यांनी माहिती दिली. उत्पादन व्यवस्थापन विषयावर पुणे येथील तांत्रिक सल्लागार पंकज कामडी यांनी मार्गदर्शन केले. नाशिक इंडस्ट्रियल क्लस्टरचे सहकार्य या योजनेसाठी नेहमीच राहील, असे सीईओ हर्षवर्धन गुणे यांनी सांगितले.
‘डिझायनिंग क्लिनिक’ उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण