आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi Less Response To Business Strike

व्यावसायिक बंदला अल्प प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलबीटी व जकात करही नको, या मागणीसाठी व्यापार्‍यांनी शुक्रवारी दुकाने बंद ठेवून मुंबईला सभेला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रविवार कारंजावरील घाऊक व्यापार्‍यांची काही दुकाने वगळता इतरत्र दुकाने सुरू असल्याने बंदचा फज्जा उडाला. दरम्यान, आझाद मैदानावरील सभेत दोन्ही कर रद्द करण्याचे लेखी आश्वासन देणार्‍या राजकीय पक्षालाच मतदान करण्याचा ठराव झाल्याने सरकारसमोर अडचण वाढली आहे.

आरकेवरील काही घाऊक विक्रेत्यांचीच दुकाने बंद; अन्यत्र सुरळीत सुरू

व्यापार्‍यांच्या या मागणीला भाजप व्यापारी आघाडी, आप, काही डाव्या नेत्यांनी पाठिंबा दिला; मात्र व्यापारी, दुकानदारांनी पूर्ण भाग घेतला नाही. मेनरोड, एमजीरोड, सराफ बाजार, बोहोरपट्टीसह बाजारपेठा सुरू होत्या.
एलबीटी नको, बंदही नको : दुकानदारांना याबाबत विचारणा केली असता, आम्ही दुकाने अर्धवट बंद ठेवल्याचे न पटणारी उत्तरे व्यापार्‍यांनी दिल्याने ते एलबीटी रद्दच्या मागणीसाठी किती आग्रही आहेत हे स्पष्ट झाले. नाशिकमधून विविध व्यापारी संघटनांच्या जवळपास पाचशे प्रतिनिधींनी हजेरी लावली.
या संघटनांचे बंदसाठी प्रयत्न : सिमेंट असो., इलेक्ट्रिकल र्मचंट असो., नवीन नाशिक व्यापारी असो., जेलरोड व्यापारी असो., नाशिकरोड- देवळाली व्यापारी असो., हार्डवेअर असो., घाऊक व्यापारी असो., किरकोळ व्यापारी विक्रेता असो. या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मात्र, संघटनेतील बहुतांश दुकानदारांची दुकाने सुरूच होती.
भाजप वगळता इतरांची गैरहजेरी : भाजप, डावी आघाडी आणि आप यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपचे पदाधिकारी-नेते वगळता अन्य पक्षाचे नेते शुक्रवारी व्यापार्‍यांना मुंबईकडे जाताना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित नव्हते.
मुंबईच्या सभेतील ठराव : एलबीटी व जकात रद्द करण्याचे लेखी आश्वासन देणार्‍या राजकीय पक्षालाचा मतदान करण्यावर शिक्कामोर्तब, एलबीटी आठ दिवसांत रद्द करण्याचा सरकारला इशारा, असहकार सुरु करत केवळ एकुण कराच्या 10 टक्केच एलबीटी भरला जाईल. उर्वरित कराच्या 90 टक्के रकमेवर केवळ 2 टक्के दराने व्याज भरणार.