आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Ten People On Hunger Strike Sent To Hospital, Divya Marathi

दहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव नगरपालिकेसाठी पाचव्या दिवशीही ‘आप’चे उपोषण सुरू

लष्कराच्या ट्रकचा धक्का

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंदोलकांच्या मंडपाला लष्कराच्या ट्रकचा धक्का बसला. त्यामुळे मंडप कोसळला. लष्कराच्या अधिकार्‍यांनी तातडीने नुकसान भरपाई देऊन ते रवाना झाले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही
शेवगाव ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करावे, या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेल्या दहा उपोषणकर्त्यांची शुक्रवारी प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम आदमी पक्षातर्फे (आप) सोमवारपासून (17 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
नितीन दहिवाळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ने हे उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) पालकमंत्री मधुकर पिचड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांची विनंती धुडकावत जोपर्यंत आमच्या हातात पत्र दिले जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे दहिवाळकर यांनी सांगितले. आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम राहिले. शुक्रवारी अंजना मातंग, पद्मा चव्हाण, रमेश खरात, कडू भास्कर, आसाराम कोरडे, नंदा दळवी, बबन कोरडे, साखरबाई दुसुंग, उषा मोहिते व संगीता खरात यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. बुधवारी विमल मोहिते, रमेश खरात, अंजना मातंग, अशोक भारस्कर व सुरेश चव्हाण यांची प्रकृती काही प्रमाणात खालावली होती. प्रकृती जास्त खालावल्याने बुधवारी सुरेश चव्हाण यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते