आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत सामाजिक संस्थ‌ांतर्फे स्वच्छता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडकोत ठिकठिकाणी साठलेला कचरा, निर्माण होणारी दुर्गंधी, वाढणारे डासांचे प्रमाण या समस्यांवर प्रशासन कार्यवाही करेल प्रश्न सुटेल, यावर अवलंबून राहता सिडकोतील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून, या संस्थांचे सदस्य दर रविवारी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता करत आहेत. ज्या भागात कचरा दिसेल तिथे सफाई करून स्वखर्चातून डास प्रतिबंधक धूरफवारणी करीत आहेत. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

सिडकोतील वाढते कचऱ्याचे साम्राज्य लक्षात घेता आपणच पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ करू, अशी संकल्पना शिवमुद्रा युवा मित्रमंडळाचे किरण शिंदे, एकनिष्ठ युवा फाउंडेशनचे योगेश गांगुर्डे ज्ञानसाधना सामाजिक शिक्षण संस्थेचे योगेश पाटील यांनी प्रत्यक्षात आणली आहे. कुणाला सांगत बसण्यापेक्षा स्वत: झाडू हातात घेत हे कार्यकर्ते स्वच्छता करतात. हे दृश्य पाहताच इतर नागरिकही या मोहिमेत सहभागी होतात सर्व परिसर स्वच्छ करतात. किरण शिंदे यांनी पवननगर भागात रविवारी स्वच्छता मोहीम राबविली आणि संपूर्ण परिसर स्वच्छ झाला. चौकातील कचरा साफ होताच चिमुकल्या छोट्या दोस्तांनी क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. योगेश पाटील यांनी पवननगर, लोकमान्यनगर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने या भागात नागरिकांची जनजागृती मोहीम राबविली. स्वखर्चातून धूरफवारणी केली, तर योगेश गांगुर्डे यांनी पवननगर येथील उद्यानात स्वच्छता केली. यातून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश मिळत असून, नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, यापुढे यांच्या कामात सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले.