आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरांच्या सत्काराच्या शालींनी अादिवासींना ऊब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राजकीय मंडळी एकत्र अाली की, ‘शालजाेडीत’ले अाहेर कधी पडतील याचा नेम नसताे. दुसरीकडे याच मंडळींचे स्वागत अाणि सत्कार शाल-श्रीफळांनी केला जाताे. म्हणूनच शाल अाणि राजकीय पुढारी यांच्यातील बंध अतूट अाहे असे म्हटले जाते. पण, सत्कारातून मिळालेल्या या शालींचा उपयाेग सत्कर्मासाठी झाला तर...! नाशिकचे महापाैर अशाेक मुर्तडक यांनी असा वेगळा उपयाेग या शालींचा केला अाहे.

मुर्तडक यांनी अापल्याला मिळालेल्या शाली जमा करून त्या दुर्गम अादिवासी पाड्यांवरील बांधवांना देण्याचे कार्य सुरू केले अाहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी नंदुरबारमधील ताेरणमाळ येथील ३०० अादिवासींना शालींचे वाटप केले. माेठ्या पदावरील मंडळींना अशा शाली सत्कारात मिळतात काहीजण त्याचा उपयाेग वैयक्तिक कामासाठी, तर काही अापल्या मंडळांच्या कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी करतात. काही जण तर शाली जमा करून दुकानदारांनाही विकल्याचे एेकिवात अाहे. परंतु, या शालींचा सदुपयाेग करण्याचा अभिनव पायंडा शहराचे प्रथम नागरिक अर्थात, महापाैर अशाेक मुर्तडक यांनी पाडला अाहे. दीड वर्षाच्या काळात सुमारे ७०० ते ८०० शाली त्यांच्याकडे जमा झाल्या अाहेत. या शाली संकलित करून त्या दुर्गम अादिवासी पाड्यांवर वाटण्याचे काम ते सध्या करीत अाहेत. दिवाळीच्या सुटीच्या काळात शहादा तालुक्यातील ताेरणमाळ या अादिवासी पाड्यातील ३०० अादिवासींना शाली अाणि कपड्यांचे वाटप करण्यात अाले, तसेच उर्वरित शाली येत्या काही दिवसांतच सारणखेडे या गावातील अादिवासींना वाटण्यात येणार अाहेत.

इतर वस्तूंचेही वाटप
अादिवासींना शालींचे वाटप करतानाच बिस्कीट पुड्यांचेही महापाैरांच्या वतीने वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे अतिगरजू अादिवासींना कपडेदेखील िदले जातात. ताेरणमाळ येथील अादिवासींना नुकतेच ३०० शाली, १०० चादरी, बिस्कीट पुडे अादींचे वाटप करण्यात अाले.

अापले कर्तव्यच
^पाड्यांवरील अादिवासींच्या अंगावर पुरेसे कपडेही नसतात. हिवाळ्याच्या काळात किती हाल हाेत असतील याची जाणीव या पाड्यांमध्ये फिरल्यावर येते. म्हणूनच मी माझ्याकडील शाली या बांधवांना देण्याचे कर्तव्य निभावत अाहे. - अशाेक मुर्तडक, महापाैर,नाशिक महापालिका