आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेवी संस्थांच्या नोंदणीत होतेय वाढ, धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकरता शेकडो प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- समाजसेवीसंस्थेच्या माध्यमातून जनसेवा करणारे क्वचित आढळतात. समाजसेवेच्या उद्देशान संस्था स्थापन होत आहेत. अनेक राजकीय, मोठे व्यावसायिक समाजात ओळख निर्माण व्हावी याकरिता विविध उपक्रम करतात. मात्र यांच्याकडून नोंदणी वेळी ठरलेल्या उद्दिष्टांची पूर्तता होत नसल्याचे अढळून येत आहे. धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकरता शेकडो प्रस्ताव बहुउद्देशीय संस्थांचे येत आहे.
समाजसेवा करण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले. वारसा समाजातील काही संधी साधूंनी घेतलेला दिसतोय. सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून काळ्याचे गोरे करणारे संस्था वाढत आहे. कामांचा मोठा गाजावाजा केला जातो. शासकीय योजनांचा भरपूर‘ निधी’ स्वत:चा फायदा केला जातो अथवा होते. काळ्या पैशांची उलाढालदेखील सेवाभावी संस्थांच्या आड होत आहे. शासकीय अधिकारीदेखील सेवाभावी संस्था आपल्या आतेष्टांच्या नावे काढून विविध योजनांचा भरपूर लाभ घेत आहे. काही संस्थाचा उद्देश साफ आहे. वंचितांपर्यन्त योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करतात. बोटावर मोजण्याइतक्या संस्थाच प्रमाणिक पणे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही संस्था केवळ आपले उखळ पांढरे करण्याच्या प्रयत्नात असतात. मोठे व्यावसायिकांना नफ्यामधील २० टक्के रक्कम सेवाभावी कार्यास देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पण सर्वच नफा आपल्याच संस्थेच्या नावे टाकून शासनाची फसवणूक करत आहेत. अशा संस्थांवर शासनाने अंकुश ठेवणे अपेक्षीत आहे.
सेवाभावी’ नावाचा होतोय गैरवापर
सेवाभावीनावाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. संस्थेच्या माध्यमातून जनसेवा घडायला हवी. तरच सेवाभावी संस्थांचे मूळ उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. मात्र, तसे होत नसल्याचीही काही उदाहरणे आहेत. नामदेव शिंदे