आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड रोखण्यासाठी सॉफ्टवेअर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तीन तरुणांनी ‘मी अगेन्स्ट रेप’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.दिल्लीतील घटनेनंतर नाशकातील गुणवंत बत्ताशे (23, अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपर) अनुप उन्नीकृष्णन (24) व जयेश बनकर (23, ग्राफिक्स डिझायनर) या इंजिनिअर्सच्या मनात अत्याचार रोखण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचा विचार आला व त्यांनी लगेच काम सुरू केले. आठवडाभराच्या परिश्रमानंतर ते यशस्वी झाले. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.
मी अगेन्स्ट रेप
दोन आठवड्यांत तयार केलेल्या ‘मी अगेन्स्ट रेप’ हे सॉफ्टवेअर महिलांवर आलेल्या संकटाची पोलिस, आप्तस्वकीयांना तत्काळ धोक्याची सूचना देईल.
काय आहे सॉफ्टवेअरमध्ये
महिलांच्या सुरक्षेसाठी वन टच हेल्पलाइन, टिप्स, घटनास्थळाच्या घटनेची वन टच रेकॉर्डिंग, प्रत्येक दहा मिनिटाला करंट लोकेशन तसेच हेल्प बटण दाबल्यावर मदतनिसास कॉल, एसएमएसही पाठवला जातो. त्यात ‘आय एम ट्रबल’ असा आशय असून त्याबरोबरच घटनास्थळाचा पत्ता, गुगल नकाशाची लिंक, वेळ याशिवाय प्रबोधनासाठी घोषवाक्यांचा यात समावेश आहे.
सॉफ्टवेअर मोफत देणार
सॉफ्टवेअर मोफत देण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. https://play.google.com/store/apps/details?id=com.nebulastudios.meagainstrape या लिंकवर जाऊन ते अँड्रॉइड मोबाइल हँडसेटवर डाउनलोड करता येईल.