आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाकडून दर्जा तपासण्यासाठी महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण होणार आहे. गुणवत्ता आणि सोयी-सुविधांप्रमाणे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, आणि ‘ई’ या पाच श्रेणीत उतरत्या क्रमाने विभागणी करण्यात येणार आहे. डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात संपूर्ण मूल्यमापन पूर्ण होईल.

विद्यापीठ नियुक्त समिती महाविद्यालयांना भेट देऊन पाहणी करेल. निकषांसाठी एकूण ३०० गुण असतील. यात ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या महाविद्यालयांना ‘अ’ श्रेणी मिळेल.
विद्यापीठाशी संलग्नित ११९पैकी ४० महाविद्यालये अनुदानित आहेत. त्यांचे लेखापरीक्षण आधी होईल. दुसऱ्या टप्प्यात ४० महाविद्यालयांचे लेखापरीक्षण येत्या शैक्षणिक वर्षात तर उरलेल्या महाविद्यालयांची पाहणी त्याच्या पुढील वर्षात होणार आहे. अशा तीन टप्प्यांत लेखापरीक्षण होईल. अशा पद्धतीने लेखापरीक्षण दर तीन वर्षांनी होणार आहे, अशी माहिती महाविद्यालये विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक आर. वाय. पाटील यांनी दिली.

श्रेणी टक्के शेरा
७० टक्के जास्त उत्तम
६० ते ७० टक्के चांगले
५० ते ६० टक्क समाधानकारक
४० ते ५० टक्क खराब
(खबरदारीचीनोटीस)
३९टक्के कमी खूपच खराब
(कारणेदाखवा नोटीस)

गुणांची वर्गवारी अशी
शैक्षणिक गुणवत्ता १५०
पायाभूत विद्यार्थी सुविधा ६० गुण
प्रशासकीय कामकाज ३० गुण
व्यवस्थापन धोरण २० गुण
आर्थिक व्यवस्थापन २० गुण
संस्थांशी सामंजस्य करार २०
एकूण गुण ३००

^महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यमापन विद्यापीठ नियुक्त समिती करेल. वेगवेगळ्या आठ समिती नेमल्या जातील. या समिती प्रत्येक महाविद्यालयास स्वतंत्ररीत्या भेट देऊन अहवाल सादर करतील. डिसेंबरमध्ये यास सुरुवात होईल.” प्राचार्यआर. वाय. पाटील, बीसीयूडी संचालक, विद्यापीठ
महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण