Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Solar Energy Generation On Petrol Pump

दहा पेट्राेलपंपांवर साैरऊर्जा निर्मिती,प्रत्येकी ३५०० लिटर डिझेल बचत

हेमंत भाेसले | Mar 14, 2016, 08:33 AM IST

  • दहा पेट्राेलपंपांवर साैरऊर्जा निर्मिती,प्रत्येकी ३५०० लिटर डिझेल बचत
नाशिक - जिल्ह्यातील दहा पेट्राेलपंपचालकांनी साैरऊर्जा प्रकल्पांना कवेत घेतले अाहे. त्यामुळे वर्षभरात प्रत्येक पंपाची ३५०० लिटर डिझेलची बचत हाेणार असून, या यंत्रणेच्या कार्यकाळात तब्बल १९० टन इतक्या कार्बनडाय अाॅक्साइडची निर्मिती थांबणार अाहे. दहा पेट्राेलपंपांचा एकत्रित विचार केल्यास १९०० टन इतक्या कार्बनडाय अाॅक्साइडची निर्मिती २५ वर्षांत थाबवता येणार असल्याने संबंधित पंपचालकांना हजार वृक्ष लावल्याचे समाधान मिळणार अाहे. या उपक्रमाचा अादर्श नाशिक शहरातील पंपचालकांनी घेत साैरऊर्जा प्रकल्प उभारल्यास शहरातील प्रदूषण घटेल.

सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यास सौर प्रकाशीय ऊर्जा संबाेधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत लाख मेगावॅट ऊर्जानिर्मिती साैरऊर्जेच्या माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट समाेर ठेवले अाहे. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याने अाता साैर ऊर्जेला अापलेसे करणे सुरू केले अाहे.

वर्षभरातलाख ८० हजाराच्या खर्चात बचत : विद्युतनिर्मितीउपकरण लावल्यापासून संबंधित पेट्राेलपंपाच्या माध्यमातून ३६०० लिटर डिझेल वाचले अाहे. राेजच्या १० लिटर डिझेलसाठी सुमारे ५०० रुपये खर्च येत हाेता. वर्षभरात अशा लाख ८० हजार रुपयांचा खर्च साैर उपकरणामुळे वाचत अाहे. डिझेलसाठीचे परकीय चलनही यातून वाचले अाहे.

एक पंप काढताे ९०० झाडांची भरपाई : एकटन कार्बन डाय अाॅक्साइडवर मात करण्यासाठी वड, पिंपळ अशा झाडांचा अाॅक्सिजन उपयाेगी पडताे. अशा प्रकारे एका पेट्राेल पंपाला साैर विद्युतनिर्मितीची यंत्रणा लावल्यास सुमारे ९०० झाडे लावण्यासारखे समाधान लाभते. दहाही पंपांचा एकत्रित विचार करता संबंधितांना ९००० झाडे लावल्यासारखे वाटणार अाहे.
उपकरणांसाठीसात लाखांचा खर्च : साैरऊर्जाविद्युतनिर्मिती उपकरण लावण्यासाठी एका पेट्राेलपंपाला सुमारे लाख रुपये इतका खर्च येताे. हा खर्च तीन ते चार वर्षांत भरून निघताे. उद्याेग अाणि व्यवसायांना उपकरण लावण्यासाठी सरकारी माध्यमातून सूट मिळत नसली तरीही घसारा लाभ मात्र पहिल्या वर्षी ८० टक्के मिळताे.

पर्नाड रिकार्ट कंपनीत १६०० युनिट वीजनिर्मिती : दिंडाेरीतील पर्नड रिकार्ट कंपनीत ३४५ किलोवॉटच्या प्रकल्पातून दिवसाला १६०० युनिट, वर्षभरात लाख युनीट वीजनिर्मिती हाेणार अाहे. २५ वर्षात तब्बल १३ हजार टन इतकी कार्बनडाय अाॅक्साइड निर्मिती कंपनी वाचवू शकते.

एक्स्प्रेस इनलाही साैरऊर्जेचे कोंदण
हाॅटेल एक्स्प्रेस इनने सप्टेंबर २०१५ मध्ये ७५ किलाेवॅटचा साैर ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प उभारला अाहे. त्यातून दिवसाला ३५० युनिट वीजनिर्मिती हाेते. वर्षभरात सुमारे लाख १२ हजार युनिटची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पातून २५ वर्षांत हजार टन कार्बनडाय अाॅक्साइडची निर्मिती राेखता येणार अाहे, अशी माहिती हाॅटेल एक्स्प्रेस इनचे चीफ इंजिनिअर फिलिप्स सिक्वेरा यांनी दिली.

पंपावर १८ युनिट वीजनिर्मिती
प्रत्येक पेट्राेलपंपाला दरराेज सुमारे १० लिटर डिझेल वापरले जाते. त्यातून वर्षाला टन कार्बनडाय अाॅक्साइडची निर्मिती हाेते. परंतु, सौरऊर्जेपासून विद्युतनिर्मितीचा प्रकल्प पेट्राेलपंपावर उभारल्याने तितक्याच कार्बनडाय अाॅक्साइडची निर्मिती राेखता येईल. साैर उपकरणामुळे संबंधित पंपावर साधारणत: १८ युनिट वीजनिर्मिती हाेते. एक साैरऊर्जा विद्युतनिर्मिती प्रकल्पाचे अायुर्मान किमान २५ वर्षांपर्यंत असते.
जिल्ह्यात चळवळ
राज्य देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी साैरऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्याची गरज अाहे. नाशिक जिल्ह्यातील दहा पंपचालकांनी साैर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन जणू चळवळच उभी केली अाहे. - अनिल सुराडकर, सदस्य,अपार ऊर्जा

तर १५ गावे प्रकाशमान
प्रत्येक घरावर किवॉटचे साैर ऊर्जा उपकरण लावल्यास वाचणाऱ्या वीजेतून सुमारे १५ खेडे उजळतील. विजेच्या क्षेत्रात दीर्घकाळासाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जाच हवी. - शाम दंडे, साैरऊर्जा तज्ज्ञ

Next Article

Recommended