आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅथ्यूने डायरीत लिहिले होते, कोर्ट मार्शलपेक्षा आत्महत्या बरी; लष्कराचे माध्यमांकडे बोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोर्ट मार्शल होण्याच्या भीतीने डी.एस. रॉय मॅथ्यूज या जवानाने आत्महत्या केल्याचा उलगडा देवळाली कॅम्प पोलिसांनी केला आहे. ‘कोर्ट मार्शल होण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, मॅडम मला क्षमा करा, सर मला क्षमा करा’ असा मजकूर मॅथ्यूजच्या डायरीत लिहिलेला आढळल्याने हा घातपात नसून आत्महत्याच असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
 
दुसरीकडे  “माझे पती माझ्याशी फोनवर बोलत असताना रडत होते. त्यामुळे त्यांच्यासोबत नेमके काय घडले हे मला जाणून घ्यायचे आहे,’ असा आरोप नाशिकच्या देवळाली छावणी परिसरात मृत झालेले जवान रॉय मॅथ्यूजच्या पत्नीने केला आहे. पत्नी फिनी रॉयच्या मते, ‘२५ फेब्रुवारी रोजी आमच्या दोघांमध्ये फोनवरून शेवटचा संवाद झाला. 
 
शवविच्छेदन अहवालातही गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नातेवाइकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात न घेतल्याने तणाव वाढला. पोलिसांनी जवानाच्या नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाषेची अडचण येत असल्याने तोडगा निघाला नाही.
 
त्यावेळी, माझ्याकडून मोठी चूक झाली असे सांगत ते रडत होते. त्याच वेळी टीव्हीवर त्यांची व्हायरल झालेली क्लिप दाखवली जात होती.  दरम्यान, माध्यमांनी मॅथ्यूजला माहीत न होऊ देता त्याचा व्हिडिओ बनवल्यामुळे त्याने अात्महत्या केली असावी, अशी शंका लष्कराने व्यक्त केली आहे. 
 
स्टिंगमध्ये जवान मुलांना शाळेत सोडताना दिसले
 एका मराठी संकेतस्थळाने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये लष्करी जवान अधिकाऱ्यांचे कुत्रे फिरवताना तसेच मुलांना शाळेत नेताना दिसत आहेत. मॅथ्यूजचा चेहरा लपवून मुलाखत घेतली. त्याने अधिकाऱ्यांवर शोषणाचे आरोप केले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले.   
 
माध्यम प्रतिनिधीने अंधारात ठेवून बनवला व्हिडिओ
कुटुंबीयांच्या मते, मॅथ्यूजने २५ फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांना शेवटचा फोन केला. त्या वेळी तो खूप घाबरला होता. त्याने सांगितले की, एका माध्यम प्रतिनिधीला मी सहकाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. याचे चित्रीकरण करणार नसल्याचा विश्वास माध्यम प्रतिनिधीने मला दिला. मात्र, त्याने गुप्तपणे चित्रीकरण करून घेतले होते. या प्रकरणामुळे आपली नोकरी जाईल आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी मॅथ्यूजला भीती होती.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, अधिकाऱ्यांना पाठवला सॉरीचा एसएमएस..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...