आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठी केस हरले, तरीही सलमानचे वकील!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानचे वकील श्रीकांत शिवडे यांनी अनेक बड्या आणि हायप्रोफाइल खटल्यांत युक्तिवाद केला आहे. मात्र, यश कोणालाही मिळाले नाही. यासंदर्भात शिवडे म्हणाले, एक वकील म्हणून खटला योग्य पद्धतीने लढणे हे माझे काम आहे. निकालाचा विचार करणे हे नाही.
अॅड. श्रीकांत शिवडे, न्या. देशपांडे यांच्याबाबत जाणून घ्या दडलेल्या काही रंजक गोष्टी
सलमानचा खटला लढवण्याचा किस्साही रंजक आहे. २००६ मध्ये काळवीट प्रकरणात सैफअली खान आणि सोनाली बेंद्रेचा वकील होतो. यादरम्यान हॉटेलमध्ये सलमानची भेट झाली. यानंतर सलमानचे मित्र आणि अॅड. आनंद देसाई यांनी शिवडे यांना सलमानचा खटला लढण्यास सांगितले. त्यामुळे शिवडे यांनी पहिल्यांदा काळवीट प्रकरण आणि नंतर हिट अँड रन प्रकरणात सलमानचे वकील झाले. सध्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री आहे. अभिनेता शायनी आहुजाच्या मोलकरीण बलात्कार प्रकरणात शिवडे यांनीच युक्तिवाद केला होता. मात्र, शायनीला शिक्षा झाली. चित्रपट निर्माता भरत शहाचा खटलाही त्यांनीच लढवला. शहा यांना एका वर्षाची शिक्षा झाली. त्यांनी तुरुंगात १४ महिने काढल्याने शिक्षा भोगण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल श्रीकांत पुरोहित यांची बाजू मांडली. १९९२ च्या एका प्रकरणात शिवडे यांनी वारंवार स्थगिती घेतल्यामुळे बार काैन्सिलने त्यांची सनद वर्षांसाठी निलंबित केली होती. अभिनेत्री झिया खान प्रकरणात आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजवर गंभीर आरोप झाले होते.

निकाल देण्यापूर्वी १५ दिवस आधी झाली होती न्या. देशपांडेंची बदली
सलमानचा खटला खूप लांबत आहे, असे मुंबईच्या सत्र न्यायालयातील न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांना वाटत होते. सरकारी पक्षाने डिसेंबर २०१४ पर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा,अशीही त्यांची इच्छा होती. तसे झाल्यावर सुनावणी १५ जानेवारीपर्यंत पूर्ण व्हावी असे वाटले. तसेही होऊ शकले नाही. अखेर या खटल्याचा निकाल मे रोजी आला.

नागपूरचे रहिवासी असलेले देशपांडे मुंबईत येण्याआधी अलिबागमध्ये जिल्हा न्यायाधीश होते. मुंबईत ते दादर न्यायालयात अतिरिक्त दंडाधिकारी म्हणून आले होते. यानंतर २०१२ मध्ये ते मुंबई सत्र न्यायालयात नियुक्त झाले. न्या. देशपांडे काय विचार करतात हे सांगणे कठीण असल्याचे म्हटले जाते. २२ एप्रिलला त्यांची साताऱ्याला बदली झाली. मात्र, निकाल दिल्यानंतर त्यांना जूनमध्ये रिलिव्ह व्हायचे आहे. गुजरातचे माजी आयपीएस डी.जी. वंजारा प्रकरणात त्यांनी एक सुनावणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...