आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनाेग्राफी केंद्रांचा बंद, गर्भलिंग निदान चाचणीविराेधी कायदा अंमलबजावणीतील अन्यायाचा निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रसूतीपूर्वनंतर गर्भलिंगननिदान चाचणी प्रतिबंध कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) चुकीच्या अंमलबजावणीमुळे सोनोग्राफी तज्ज्ञांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बुधवारी (दि. १५) नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशन, रेडिआेलॉजी संघटना स्रीरोगतज्ज्ञ संघटनांतर्फे एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. रेडिआेलॉजिस्टना येणाऱ्या अडचणींबाबत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना माहिती देऊन कायद्यात बदल करण्याची मागणी निवेदनाद्वारे संघटनेतर्फे करण्यात आली.

संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसूतीपूर्वी नंतर गर्भलिंगननिदान चाचणी प्रतिबंध कायद्यांतर्गत सोनोग्राफी तज्ज्ञांच्या किरकोळ कागदपत्रांमधील त्रुटी समोर ठेवून संबंधित तज्ज्ञांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते मागे घेण्यात यावेत. किरकोळ कागदपत्रांतील त्रुटीमुळे सोनोग्राफी मशीन सील करू नये, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. तसेच, हा गंभीर विषय लोकसभेत मांडण्याची मागणी संघटनेच्या वतीने खासदार हरिश्चंद्र चव्हाण हेमंत गोडसे यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान, बुधवारी शहरातील सर्वच सोनोग्राफी सेंटर बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून रेडिआेलॉजी संघटनेच्या वतीने शहरातील काही भागात सोनोग्राफीची सुविधा सुरूच ठेवण्यात आली होती. यामुळे रुग्णांना या बंदमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. महापालिका स्तरावर रेडिआेलॉजिस्टना कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नसल्याचे आश्वासन आयुक्त डॉ. गेडाम यांनी संघटनेला दिल्याची माहिती नाशिक इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोज चोपडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. मिलिंद पिंप्रीकर, डॉ. मंगेश थेटे, डॉ. सुजाता कुलकर्णी, डॉ. सुशांत भदाने, डॉ. लालेश नाहटा आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन
दरम्यान,इंडियन मेडिकल असोसिएशन, रेडिआेलॉजी संघटना, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन या कायद्यातील त्रुटींबाबत माहिती देऊन त्यात त्वरित बदल करण्याची मागणी केली. या कायद्याची सविस्तर माहिती घेऊन विधानसभेत प्रश्न मांडून त्याचा निकाल लावणार असल्याचे आश्वासन महाजन यांनी दिले.
प्रतीकात्मकरीत्या काम बंद, पण अत्यावश्यक सेवा सुरू
गर्भतपासणीविराेधी कायद्याचे स्वागतच आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असून, त्याचा प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा करणाऱ्यांना नाहक मनस्ताप होतो. रुग्णाची माहिती इतर उपचारांचा अर्ज भरताना किरकाेळ स्वरूपाच्या त्रुटी झाल्या तरी एकच शिक्षा हाेते. याएेवजी कागदपत्रांच्या प्रक्रियेतील त्रुटींसाठी स्वतंत्र कमी प्रमाणात शिक्षेची तरतूद असावी. आजचा बंद प्रतीकात्मक स्वरूपाचा हाेता. पण, अत्यावश्यक रुग्णांना सुविधा देण्यात आल्या.
डाॅ.सुजाता कुलकर्णी, अध्यक्ष, गायनॅकोलॉजिस्ट असो.

तज्ज्ञांवरीलफौजदारी गुन्हे मागे घेण्याची आवश्यकता
संबंधितकायद्यांतर्गत सोनोग्राफी तज्ज्ञांच्या किरकोळ कागदपत्रांमधील त्रुटी समोर ठेवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते मागे घेण्यात यावेत. तसेच, काय्यात बदल करण्याचीही गरज आहे.
डॉ.मनोज चोपडा, अध्यक्ष, आयएमए, नाशिक शाखा

रुग्णांची अडवणूक केली नाही
गर्भलिंग निदान चाचणी विराेधी कायद्याच्या विरोधात नाशिक शहरातील सोनोग्राफी केंद्रे बंद ठेवण्याचे आंदोलन बुधवारी करण्यात आले. मात्र, आंदोलनामुळे रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून काही केंद्रे सुरूच ठेवली होती. केवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
डॉ.मंगेश थेटे, सचिव, आयएमए, नाशिक शाखा
काय आहे मागण्या...
{ किरकोळ कागदोपत्री त्रुटीवरून फौजदारी खटले दाखल करू नयेत.
{ कागदोपत्री त्रुटींसाठी सोनोग्राफी मशीन सील करू नये.
{ रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुलभ सुटसुटीत करण्यात याव्यात.
{ बदली रेडिआेलॉजिस्ट प्रक्रिया सुटसुटीत व्हावी.
{ न्यायालयीन प्रविष्ट प्रक्रियेमध्ये, निकाल लागेपर्यंत रजिस्ट्रेशन देण्यात यावेत.
{ खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रॅक्टिसची परवानगी देण्यात यावी.