आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याधुनिक शस्त्रांसह बॉम्बशोधक सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्यात नाशिक त्र्यंबकेश्वरच्या तीनही पर्वणींना कमिान ७५ लाखांच्या संख्येने देशभरातून भाविक दाखल होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळणार असल्याने त्यादरम्यान दहशतवादी हल्ल्यासारख्या कारवाया रोखण्यासाठी बाॅम्बशोधक नाशक (बीडीडीएस)ची ११ पथके अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज झाली आहेत. दुसरीकडे, वर्षभरापूर्वी सिंहस्थासाठी विशेष मंजूर केलेला एक कोटी कमितीचा रोबोपर्वणी अवघ्या चौदा दविसांवर येऊन ठेपली असतानाही अद्याप उपलब्ध झालेला नाही. परिणामी यंत्रणेला जुन्याच रोबोटवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या गुरुदासपूरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यावरदेखील दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी नाशिक दौऱ्यात मान्य केले होते. तेव्हापासून पोलिस बंदोबस्ताची रंगीत तालीम सुरू आहे. त्याअंतर्गत राज्यातील नऊ बीडीडीएस पथके शहरात दाखल झाली आहेत. नाशिक पोलिसांच्या दोन पथकांसह अकरा पथकांकडून शहरातील धार्मिक स्थळ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, साधुग्राम, तपोवन, रामकुंड यासह गर्दीच्या ठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. या पथकांत १०० प्रशिक्षित कर्मचारी असून, त्यांच्या सहकार्यासाठी प्रशिक्षित ११ श्वानदेखील देण्यात आले आहेत.
नाकेबंदी करून श्वान पथकाकडून परराज्यातून येणाऱ्या खासगी बस आणि ट्रॅव्हल्स बसची कसून तपासणी सुरू आहे. कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी बाॅम्बसूट, रोबोट इतर साहित्य असल्याने यंत्रणा सक्षम असल्याचे पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुन्या रोबोटवरच भिस्त
बीडीडीएसपथकात नवीन रोबोट दाखल होणार होते. तांत्रिक अडचणीमुळे नवीन रोबोट खरेदी रखडली. नवीन रोबेटची एक ते सव्वा कि.मी. अंतरावरील बॉम्ब नष्ट (डिस्पोज) करण्याची क्षमता होती. तर, जुन्या रोबोटची केवळ २०० ते ३०० मीटरची क्षमता आहे.

पर्वणी काळातआठ दविस बजावणार कर्तव्य
राज्यातीलपथक पर्वणीच्या चार दविस आधी आणि नंतर चार दविस असे आठ दविस कर्तव्य बजावतील. गर्दीच्या काळात सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी या पथकांवर असेल. शहरातील तसेच शहराबाहेरील लॉज आणि हॉटेल्सची पथकांकडून दैनंदनि तपासणी सुरू आहे.

राज्यभरातून आले पथक
पुणे,औरंगाबाद, अहमदनगर, नवी मुंबई, वसई, विरार, वाशी, हिंगोली, जालना असे एकूण नऊ नाशिक पोलिसांचे दोन पथक नाशिकमध्ये बंदोबस्तावर आहेत. या ११ पथकांतील १०० कर्मचारी आणि ११ श्वान सिंहस्थ काळात स्फोटक वस्तूंचा मागोवा घेतील.