आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sophisticated Health System Will Be Ready In Kumbh Mela

कुंभमेळ्यात अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा राहणार तत्पर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यात साधू-संतांसह भाविकांना त्वरित आरोग्य सुविधा मिळावी, या उद्देशाने साधुग्राम परिसरातच चार ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दवाखाने उभारण्यात आले आहेत. त्यांचे कार्य पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. यासाठी साधुग्रामच्या परिसरात पांढऱ्या रंगाच्या ‘पॅगोडा’ स्वरूपात हे दवाखाने उभारण्यात आले आहेत.
साधुग्राममध्ये १० मीटर बाय मीटरचे आकारातील शेजारी-शेजारी दोन पॅगोडा उभारण्यात आले आहेत. त्यास पांढरा हा दवाखान्याचा रंग देण्यात आला आहे. त्यात तीन बेड, एक डॉक्टर, नर्सेस, औषध निर्माता, वॉर्डबॉय यांचा समावेश राहणार आहे. हे दवाखाने साधुग्राममधील लक्ष्मीनारायण मंदिर, अपोलो हॉस्पिटलजवळ, कपिला संगम राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मंदिराजवळ कार्यरत राहणार आहे. त्यांची उभारणी पूर्ण झाली असून, येत्या आठवडाभरात ते कार्यरत होणार आहे. याचबरोबर जनार्दन स्वामी मंदिराजवळ मुख्य दवाखाना असून, त्यात तत्काळ होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र विभागही कार्यान्वित राहणार आहे.
या ठिकाणी १२ डॉक्टर, १०० खाटा उपलब्ध करण्यात येणार आहे. याचबरोबर तत्काळ प्राथमिक उपचारासाठी बाय फूट आकारातील पांढऱ्या रंगातील पॅगोडा स्वरुपातील २३ दवाखानेही ठिकठिकाणी कार्यरत राहतील. पर्वणीच्या दिवशी विविध ठिकाणी महापालिका हद्दीत ९७ अॅम्ब्युलन्स कार्यरत राहणार आहेत. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने अॅम्ब्युलन्स कार्यरत राहणार आहेत. साधुग्रामधील हे दवाखाने उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यासाठी डॉ. जयराम काेठारी, डॉ. नारायण भाेये, डॉ. जितेंद्र धनेश्वर हे प्रयत्नशील आहेत.