आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांसाठी केंद्राकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात अद्ययावत अांतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणीस केंद्र शासनाने कोटी ७५ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली अाहे. केंद्राडून तीन टप्प्यांत हा निधी मिळणार असून, यात ७५ लाख रुपये नाशिक महापालिका खर्च करणार अाहे. सहा काेटी रुपये केंद्र शासनाकडून प्रत्यक्षात मिळणार असून, २४ हजार चाैमी जागेवर हे संकुल उभारले जाणार अाहे.
नाशिकमध्ये असे अद्ययावत संकुल असावे ते केंद्राच्या शहरी क्रीडा संकुल याेजनेंतर्गत उभारण्यासाठी पालिकेस तसा प्रस्ताव तयार करावा, असे खासदार गाेडसे यांनी सांगितले. माैजे दसक, अाढावनगर, नाशिकराेड येथील अारक्षण क्र. १३० (खेळाचे मैदान) सर्व्हे नं. ४९,६२ अाणि ६८ या जागांचा प्रस्ताव नगरसेवक शैलेश ढगे यांनी पालिका अायुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे पाठपुरावा केला. हा प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत राज्यशासनाकडे पाठवला. गाेडसे यांनी पाठपुरावा करून त्याला केंद्राकडून मान्यता मिळवून घेतली. मंजूर रकमेपैकी ६९ लाख ५० हजार रुपयांचा निधी केंद्राने वितरितही केला असून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू हाेत अाहे.

असे असेल क्रीडा संकुल
४८ मीटर बाय ४० मीटर क्रीडासंकुलात टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ खेळण्याची सुविधा असेल, तर पुरुष महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असेल. याव्यतिरिक्त ३४ मीटर बाय ३६ मीटरचे सिंथेटिक ट्रॅक काेर्ट असेल. बास्केट बाॅलचे एक काेर्ट, बॅडमिंटनचे चार काेर्ट, टेनिसकाेर्ट, हाॅलिबाॅल काेर्ट यांवर हे सर्व खेळ एकाच वेळी खेळता येतील अशी रचना अाहे. क्रीडा संकुलाच्या व्यतिरिक्त खेळाडू मैदान अारक्षणात २०० मीटर लांबीचा काँक्रीट स्केटिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, दाेन व्हाॅलीबाॅल काेर्ट, बास्केट बाॅल काेर्ट, ५०० मीटरचा जाॅगिंग ट्रॅक, पार्किंगची प्रशस्त व्यवस्थाही असेल.