आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैमित्र कुलकर्णी जागतिक पुरस्काराचे मानकरी, १० हजार अमेरिकन डाॅलर्सचा पुरस्कार मिळाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकचे युवा उद्याेजक साैमित्र कुलकर्णी यांना १० हजार अमेरिकन डाॅलर्सचा पुरस्कार प्राप्त झाला अाहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात संकल्प फाउंडेशनने अायाेजित केलेल्या परिषदेत जगभरातून अालेल्या चारशे उद्याेजकांमधून कुलकर्णी यांच्या स्वामी समर्थ इलेक्ट्राॅनिक्स प्रा. लि. या कंपनीस दुसऱ्या क्रमांकाने गाैरविण्यात अाले अाहे.
इंटेलीकॅपच्या संचालिका अॅट्रेया रायाप्राेलु, न्यू लूक अाणि अांन्थ्रा इनिशिएटिव्हचे संस्थापक टाॅम सिंग, संचालक अँड्रयू सॅलेन यांच्या हस्ते कुलकर्णी यांना या पुरस्काराने गाैरविण्यात अाले. स्वामी समर्थ इलेक्ट्राॅनिक्स हा उद्याेग अंबड एमअायडीसीत असून, कंपनी करीत असलेल्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उत्पादन निर्मिती कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी कंपनीची निवड करण्यात अाली. चार-पाच वर्षांपासून कंपनी निर्धुर चूल निर्मिती करीत असून, या चुलीच्या वापराने घरातील प्रदूषण ८० टक्के कमी हाेते ५० टक्के लाकूड कमी लागते. स्वयंपाकाचा वेळही वाचताे.
'अग्निका' या ब्रँडच्या नावाने अातापर्यंत कंपनीने सात हजारपेक्षा जास्त कूक स्टाेव्हची विक्री केली असून, एका कंपनीसाठी उत्पादक म्हणून १७ हजार स्टाेव्ह तयार करून िदले अाहेत. सायन्स फाॅर साेसायटी या संस्थेसाठी साेलर कंडक्शन डायरचे उत्पादन विपणनाचे कामही कंपनी करते. हे उत्पादन शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अाहे. कंपनी लवकरच गॅसिफायर बायाेमास स्टाेव्ह बाजारात अाणत असून, हे उत्पादन गॅसच्या उतरलेल्या किमतीतही ४० टक्के बचत देते.

१२ काेटी घरांना फायदा
देशात१२ काेटींपेक्षा जास्त घरात चुलीचा वापर हाेताे. निर्धुर चुली दुप्पट परिणामकारक असतात. लाकूड ५० टक्के कमी लागत असल्याने पर्यावरणाचे रक्षण तर हाेतेच. शिवाय, अाराेग्यावरही िवपरित परिणाम हाेत नाही. कंपनीच्या याच पर्यावरण, समाज अाराेग्य या क्षेत्रातील कामगिरीचा या पुरस्काराने सन्मान झाला अाहे. साैमित्ररमेश कुलकर्णी, उद्याेजक

पुरस्कार स्वीकारताना साैमित्र कुलकर्णी, व्यवस्थापक सचनि बागुल, विपणन व्यवस्थापक महावीर बाेर्गवे अादी.