आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममधील जागा वाटप; साधू-महंतांमध्ये सुंदाेपसुंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यास अवघ्या अाठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना प्रशासनाकडून साधू-महंतांना साधुग्राममध्ये देण्यात येणाऱ्या जागा वाटपात एका विशिष्ट अाखाड्याच्या प्रमुखाकडेच हे काम साेपविण्यात आल्याने साधू-महंतांमध्ये सुंदोपसुंदी निर्माण झाली अाहे. एकीकडे प्रशासनाकडून साधू-महंतांना निःशुल्क साेयी-सुविधा जागा उपलब्ध करून दिली जात असताना दुसरीकडे मात्र, माेक्याची अाणि छाेटे अाखाडे, खालसे असतानाही त्यांना मुबलक जागा उपलब्ध करून देण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ घडामाेडी घडत असल्याचा अाराेप साधू-महंताकडून केला जात अाहे. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने साधू महंतांमध्येच अंतर्गत वाद उफाळून अाला अाहे.

कुंभपर्वास येत्या १४ जुलैपासून शासकीय ध्वजाराेहणाने प्रारंभ हाेत अाहे. मुख्य पर्वणीचा काळ १४ अाॅगस्टपासून ते २५ सप्टेंबरचा असून, यासाठी शेकडाेंच्या संख्येने देशभरातून विविध अाखाड्यांचे साधू-महंत नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होऊ लागले अाहेत. नाशिकमध्ये तपाेवनात प्रशासनाने साधू-महंतांसाठी सुमारे ३२५ एकरावर साधुग्राम उभारले अाहे. यामध्ये साधू-महंतांच्या प्रमुख तीन अाखाडे त्यांच्या अंतर्गत ६५० खालशांमधील हजाराे साधुंच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार अाहे. सद्यस्थितीत प्रशासनाकडून अाखाड्यांना साधुग्रामधील जागेचे वाटप सुरू अाहे. प्रत्यक्षात तपाेवनात जागा वाटपावरून अाखाड्यांच्या साधू-महंतांमध्येच अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे दिसून येत अाहे.

काही अाखाड्यांच्या खालशांची संख्या इतरांच्या तुलनेत अत्यल्प असतानाही त्यांना माेक्याच्या जागा अाणि दाेन-दाेन, तीन-तीन प्लाॅट एकत्रित दिले जात अाहेत. यामध्ये प्रशासनाच्या काही अधिकारी एका अाखाड्याच्या महंतांकडून एकाच जागेचे दाेन वेगवेगळ्या अाखाड्यांना वितरण केल्याचाही प्रकार घडत असल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात अाहे. यामागे प्रशासनाकडून सर्वाधिकार दिलेल्या एका महंताचे त्यांच्यासाेबत राहणाऱ्या ठराविक महंत, महाराजांचा याेग्य पद्धतीने ‘राजशिष्टाचार’ सांभाळला जात अाहे. त्यातूनच हा वाद उफाळल्याचेही बाेलले जात अाहे. प्रशासनाने वेळीच अाखाड्यांचे महत्त्व, खालशांची संख्या, त्यात सहभागी हाेणाऱ्या साधूंची संख्या त्यांना अावश्यक असणाऱ्या जागेची माहिती घेऊन जागांचे वाटप करण्याची गरज अाहे. अन्यथा एेन पर्वणीच्या काळात साधू-महंत प्रशासनात संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही साधूंकडून दिला जात अाहे.

२००-२५० साधूंचे आगमन
कुंभमेळाताेंडावर अाल्याने शेकडाे साधू, महंत नाशिकमध्ये दाखल हाेत अाहेत. तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिरात बुधवारी दिवसभरात २०० ते २५० साधूंचे अागमन झाले. महाराष्ट्रातील विविध शहरांसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल येथील साधूंचाही त्यात समावेश आहे.

साधुंकडून थेट आरोप
प्रशासनाने साधुग्राममध्ये जागा वाटप करताना दिगंबर अाखाडा, निर्माेही अाणि निर्वाणी अाखाड्यांच्या प्रमुख महंतांना एकत्रित बसवून ताेडगा काढण्याची गरज हाेती, मात्र प्रशासनाने एकाच अाखाड्याच्या प्रमुखाकडे हे अधिकार साेपविल्याने दुजाभाव हाेत असल्याचा उघड-उघड अाराेप साधूंकडून केला जात अाहे.