आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीने सभापतींनाच काेसळले रडू...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- विकासकामांसाठी अनेकदा लोकप्रतिनिधी पुढाकार घेताना दिसतात. मात्र, काही अधिकारी अगदी बेफिकिरीने काम करताना दिसतात. असाच प्रकार शुक्रवारी सातपूर येथे दिसून आला. गतिमान काम करण्याचे अादेश देऊनही अधिकारी काम एेकत नसल्याने हतबल झालेल्या महिला सभापतींना प्रभाग समिती सभेतच रडू काेसळले. सभापतींचे अश्रू बघून संतप्त झालेल्या नगरसेविकेने तत्काळ सभापतींना धीर देत अधिकाऱ्यांविरोधात राेष व्यक्त केला.

सातपूर प्रभागाच्या सभापती उषा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी प्रभागाची मासिक सभा झाली. विक्रांत मते यांनी संताप व्यक्त केला. सविता काळे, शशिकांत जाधव प्रकाश लाेंढे यांनी तक्रारी मांडल्या. मागील सभेत झालेल्या प्रश्नांची उत्तरेही मागितली. मात्र, उत्तरे देण्यास अधिकारी असमर्थ ठरल्याने सभापतींनी कामे का केली जात नाहीत, असा जाब विचारतानाच त्यांना रडू काेसळले. त्यानंतर नगरसेवक सलीम शेख नगरसेविका सविता काळेदेखील संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सभेत लाखाे रुपयांच्या विकासकामांनादेखील मंजुरी देण्यात अाली.