आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलक्या वृक्षांची बोलती बंद; बॉटनिकल गार्डनमधील विजेच्या लपंडावाने 25 फ्लड जळाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या जवाहरलाल नेहरू वनाैषधी उद्यान (बॉटनिकल गार्डन) मधील प्रमुख आकर्षण असलेल्या बोलक्या झाडांचा लेझर शो विजेच्या लंपडावामुळे अनिश्चित कालावधीसाठी बंद झाला आहे. तसे फलकही उद्यानाच्या प्रवेशद्वारावर लावल्यामुळे एेन उन्हाळ्यात हे उद्यान बघण्यासाठी वृक्षांचा संवाद एेकण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे. 
 
मनसेची सत्ता आल्यानंतर नाशिकमध्ये नवनिर्माण करून दाखवण्याचा राज यांनी शब्द दिली होता, मात्र पालिकेची अर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे खासगीकरणातून अनेक प्रकल्प करण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्याचाच एक भाग म्हणून पांडवलेणी येथील वनाैषधी उद्यान तयार केले अाहे. बनवले गेले. वास्तविक वनविभागाचे हे उद्यान पूर्वीपासूनच होते, मात्र, टाटा ट्रस्टला जोडीला घेत राज्याच्या वनविभागाकडे पाठपुरावा करून महापालिकेला मध्यस्थी करत या उद्यानाचा कायापालट करण्यात आला. महापालिका निवडणुकीपुर्वी सिनेअभिनेता नाना पाटेकर याच्या हस्ते या उद्यानाचे दिमाखात उद‌्घाटन झाले होते. त्यानंतर रतन टाटा यांनी भेट देत अभिनव प्रकल्पाचे तोंड भरून कौतुकही केले होते. उद‌्घाटनानंतर हे उद्यान देखभालीसाठी वनविभागाकडे हस्तांतरीत झाले. उद्यान बघण्यासाठी ३० रुपये तर वृक्षांचा शो बघण्यासाठी ५० रुपये प्रतिव्यक्ती अशी आकारणी सुरू झाली. सुरुवातीला बोलक्या झाडांचा शो चर्चचा विषय ठरल्यामुळे प्रचंड गर्दी उडाली. त्यातून वादावादी वनविभाग कर्मचाऱ्यांसोबत हाणामारीही झाली. खासकरून शनिवार रविवारी हा कार्यक्रम बघण्यासाठी माेठी गर्दी होत होती आजही गर्दी कायम आहे. दरम्यान शनिवार (दि. ३०) पासून बोलक्या वृक्षांचा शाे बंद झाल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसा फलकही लावण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती विचारली असता विजेचा कमी-अधिक पुरवठा होत असल्यामुळे येथील तब्बल २५ लाइट खराब झाले आहेत. हे लाइट‌्स दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, साधारण आठ दिवसांत हा कार्यक्रम सुरू होईल. 
 
यामुळे हाेता शाे लाेकप्रिय 
या ठिकाणी तीन बाेलके वृक्ष सून त्यात एक वृद्ध अाजाेबा, अाई एका चिमुरडे झाड अाहे. जंगल समृद्ध असतानाची यात प्रारंभी कथा असून त्यात हिरवेगार वृक्ष, अानंदाने बागडणारे पक्षी, प्राणी असे वातावरण असते मात्र या जंगलात माणसे घुसतात विकासाच्या नावाखाली ते निर्घृणपणे एकेका वृक्षाची कत्तल सुरू करतात. अाईसमाेर प्रथम वृद्ध अाजाेबाला मारले जाते, त्यानंतर चिमुरड्या वृक्षाची कत्तल हाेते सर्वात शेवट मातेवरही कुऱ्हाड फिरवली जाते. मात्र, कुऱ्हाड फिरवण्याअाधी निरागस, निष्पाप वृक्षांची कत्तल करून, तुम्ही अामचाच नाही तर तुमचा स्वत:चा कसा नाश करत अाहेत, याबाबतचे अरण्यरुदन हृदय पिळवटून टाकणारे हाेते. 
 
आठ दिवसांत शो सुरू होईल 
-अनियमित वीज पुरवठ्यामुळे २५ लाइटस खराब झाले आहेत. पूर्वी हे काम किती दिवसांत पूर्ण होईल याविषयी कल्पना नसल्यामुळे ‘शो अनिश्चित कालावधीसाठी बंद’ असे फलक लावले होते. मात्र, आता आठ दिवसांत काम पूर्ण हाेईल अशी अपेक्षा आहे. त्यानुसार पुढील बुधवारनंतर शो सुरू होईल. -संजय दाबके, टाटा ट्रस्ट 
 
असे अाहे उद्यान 
-पांडवलेण्याच्या पायथ्याशी वनविभागाच्या ९३ हेक्टर जागेवर उद्यान. 
- टाटा ट्रस्टने २२ कोटी ८० लाख रुपयांच्या खर्चातून उद्यान साकारले. 
- वन उद्यानाभाेवती काेटी ६० कोटी रुपये खर्चातून सोलर इलेक्ट्रिक फेन्सिंग उभारण्यात येत आहे. 
- फुलपाखराच्या प्रतिकृतीतील काेटी ०८ कोटी रुपये खर्चातून या ठिकाणी वृक्षलागवड. 
- याशिवाय कि. मी. लांबीचा काेटी ६० कोटी रुपये खर्चातून साकारला सायकल ट्रॅक. 
-काेटी ९० लाख रुपये खर्चून माहिती केंद्र तसेच ठिकठिकाणी पाथवे बनवले. 
-चिमुरड्यांचे अाकर्षणासाठी मनोरंजनासाठी हत्ती संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. 
- उद्यानात विविध वन्यप्राण्यांच्या हुबेहुब प्रतिकृती असून जंगल सफारीचा आभास निर्माण हाेताे. 
बातम्या आणखी आहेत...