आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Bus For Sihasta Mela From Odha Railway Station

ओढा रेल्वे स्थानकाबाहेरून सिंहस्थात सुटणार शहर बस; ६० बस उभ्या राहतील अशा जागेची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - ओढा रेल्वे स्थानकाबाहेर एकाच वेळी ५० ते ६० बसेस उभ्या राहू शकतील, अशा जागेची निवड राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. ओढा स्थानकावरून भाविकांना नाशिक त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी शहर बसची सेवा उपलब्ध होणार असल्याने सिंहस्थात ओढा स्थानकावर स्पेशल गाड्या थांबवून सोडण्यासाठीची रेल्वे प्रशासनाची अडचण दूर झाली आहे.

पुढील वर्षी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येथे येण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भाविकांना नाशिकला येण्यासाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त सात सिंहस्थ स्पेशल अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या नाशिकरोडला थांबवल्यास स्थानकावर ताण पडणार असल्याने स्पेशल अतिरिक्त गाड्या ओढा स्थानकावर थांबवून सोडण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन होता. मात्र, एसटीने ओढा स्थानकाबाहेर बससाठी जागा नसल्याने बसेस थांबवण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. परंतु, त्यानंतर एसटीने जागेची निवड केल्याने रेल्वेची मोठी अडचण दूर झाली आहे.

परिवहन विभागाशी चर्चा सुरू
^देशभरातीलप्रत्येक रेल्वे स्थानकावरून भाविकांना सहजपणे नाशिकला पोहोचणे शक्य होण्यासाठी नियमित, अतिरिक्त स्पेशल गाड्यांची व्यवस्था आहे. ओढा स्थानकावरून भाविकांना शहरात पोहोचण्यासाठी बस उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्यास नेमक्या किती गाड्या सोडायच्या याचा निर्णय घेता येईल. ओढा स्थानकाबाहेरून बस सोडण्याबाबत परिवहन महामंडळाशी चर्चा सुरू आहे. - एम.बी. सक्सेना, अधीक्षक,नाशिक रोड रेल्वे स्थानक

मोठ्या जागेची निवड
^सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना ओढा स्थानकावरून नाशिक त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस देण्यासाठी ओढा स्थानकाबाहेर एकाच वेळी ६० बसेस उभ्या राहू शकतील, इतक्या मोठ्या जागेची पाहणी करून निवड केली आहे. ओढा येथून भाविकांना प्रवासासाठी बसेसची व्यवस्था होणार आहे. श्रीमतीएस. टी. जोशी, विभागीयनियंत्रक