आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावित कामांच्या गतीला पालिकेचाच ‘राेध’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहराची दिवसेंदिवस वाढणारी व्याप्ती लक्षात घेता वाहनांची संख्याही माेठ्या प्रमाणावर वाढली अाहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढून रोजच कोंडी हाेऊन वाहनचालकांना, तसेच पादचाऱ्यांना गंभीर समस्येचा सामना करावा लागत अाहे. विशेष म्हणजे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालय अशा ठिकाणांजवळ हाेणारी गर्दी लक्षात घेता अपघात हाेऊ नयेत, यासाठी वाहनांच्या गतीवर नियंत्रण अाणण्यासाठी याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे ठरते. यासाठी महापालिका प्रशासन, शहर वाहतूक पोलिस यांच्या वतीने विशेष वाहतूक समिती (ट्रॅफिक सेल) स्थापन करण्यात अाली अाहे. या समितीच्या माध्यमातून शहरात गतिरोधक टाकण्याबाबतचे अावश्यक त्या उपाययाेजना राबवण्याचे निर्णय घेतले जातात.
..तेव्हा टाकले जाते गतिराेधक : कुठेहीगतिरोधक टाकण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संस्थांकडून प्राप्त प्रस्तावांबाबत वाहतूक सेल विभागाच्या वतीने निर्णय घेतला जातो. या समितीत महापालिका उपायुक्त, शहर वाहतूक विभागाचे अधिकारी असतात. तसेच संबंधित परिसरातील स्थानिक पोलिस ठाण्याकडून ना हरकत प्राप्त झाल्यावर त्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता आहे की, नाही यांची तपासणी करून गतिरोधक लावण्यात येते. अनेकदा ज्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता नाही, त्या ठिकाणांचे प्रस्ताव वाहतूक सेल विभागाकडून नाकारलेही जातात. तसे अधिकार त्यांना असतात.

गतिरोधकांमुळे घटेल अपघात संख्या...
^शहरातील प्रमुखवर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक टाकल्यास वाहनांची गती कमी होण्यास मदत होईल. यामुळे अपघातांच्या संख्येतही नक्कीच घट हाेईल. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. -सागर राजपूत, नागरिक

प्रस्तावित ठिकाणांवर गतिराेधक बसणार कधी
सारडा सर्कलवरील नॅशनल उर्दू हायस्कूल, शालिमार परिसरातील सारडा कन्या विद्यालय, सागरमल मोदी शाळांसह दाेनशेहून अधिक ठिकाणी अद्यापही गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेण्यात अालेले नाही. परिणामी, वाहनचालक, विद्यार्थी नागरिकांना रस्ता अाेलांडताना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत अाहे. या ठिकाणांवर गतिराेधक कधी बसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.

समितीच्या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता...
सद्यस्थितीला वाहतूक सेलच्या बैठकीत शहरातील शाळा, महाविद्यालये परिसरात ७८, हॉस्पिटल परिसरात ०६, शहरातील संभाव्य अपघाताची २२ ठिकाणे प्रमुख वर्दळीची २१७ ठिकाणे अशा तब्बल ३२३ ठिकाणी गतिरोधके टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावातील निम्म्याहून अधिक ठिकाणांवर अद्यापही गतिराेधक टाकण्यात अाले नसल्याची बाब ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाली अाहे. महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलिसांनी या प्रस्तावित ठिकाणांवर गतिरोधक टाकण्याबाबत तातडीने िनर्णय घेणे गरजेचे अाहे. दरम्यान, वाहतूक विभागानेही सातत्याने बैठका घेऊन याविषयी पाठपुरावा करणे अपेक्षित असून, तसे झाल्यास कामे वेळेत पूर्ण हाेऊ शकतील.
संबंधित विभागीय कार्यालयांचीही जबाबदारी
वाहतूक सेलच्या वतीने गतिरोधक टाकण्यासंदर्भात प्रस्ताव अाल्यानंतर ताे त्या-त्या विभागांकडे साेपवला जाताे. त्यानुसार संबंधित विभागीय अिधकाऱ्यांनी त्या रस्त्यांवर गतिराेधके टाकणे अपेक्षित असते. वाहतूक विभागाने मंजुरी दिलेल्या ठिकाणी गतीरोधकांसह सूचना फलक, पांढरे पट्टे मारण्याची जबाबदारीही पालिकेला पार पाडावी लागते.

वाहनांची गती कमी करण्यासाठी गतिराेधके गरजेचीच
शाळा,महाविद्यालय, रुग्णालय अादी ठिकाणांसह प्रमुख वर्दळीच्या मार्गांवर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरून अनेकदा वेगाने वाहने हाकली जातात. त्यामुळे अपघातांची शक्यता असते. परिणामी, अशा ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक टाकणे गरजेचे असते. यासाठी ट्रॅफिक सेलच्या माध्यमातून पाहणी हाेऊन पालिका गतिराेधक टाकण्याचे काम करीत असते.
सागरमल माेदी शाळा
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, छोट्या-मोेठ्या अपघातांची मालिका कायम अाहे. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या गतीवर नियंत्रंण रहावे, यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस स्थानिक पोलिसांच्या विशेष समितीने शहरातील काही ठरावीक ठिकाणी गतिराेधक टाकण्याच्या सूचना केल्या हाेत्या. मात्र, यापैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी अद्यापही गतिराेधक वा पांढरे पट्टे मारण्यात अाले नसल्याने अपघातांची समस्या कायम अाहे. पालिकेच्या उदासीन वृत्तीने प्रस्तावित कामांना कशाप्रकारे अडथळे येत अाहेत, यावर ‘डी.बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
शहरातील वाढते अपघात राेखण्यासाठी ‘ट्रॅफिक सेल’ने तीनशेहून अधिक ठिकाणी सूचविलेल्या गतिराेधक बसविण्याच्या कामांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; शाळा, रुग्णालयासह महत्त्वाच्या ठिकाणीही गतिराेधक नसल्याने अपघातांचा धाेका
लवकरच सूचना दिल्या जातील..
पी. बी. चव्हाण, कार्यकारीअभियंता, बांधकाम विभाग
{अावश्यकठिकाणी गतिरोधक टाकण्याबाबत नेमकी काय प्रक्रिया असते?
-महापालिका वाहतूक पोलिसांच्या वाहतूक सेलमार्फत अावश्यक तेथे गतिरोधकांबाबत निर्णय घेतला जातो.
{वाहतूकसेलकडून प्रस्तावित असलेल्या ठिकाणांवर अद्याप गतिरोधक का बसविलेले नाहीत?
-अशा ठिकाणी गतिरोधक टाकण्याची जबाबदारी त्या-त्या विभागाची असून, त्यांना काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या जातील.
बातम्या आणखी आहेत...