आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिजाततेच्या दर्जानंतर ३५० विद्यापीठांत मराठी; हरी नरके यांची विशेष मुलाखत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्याचा मार्ग माेकळा झाला असून, केंद्राकडून तशी घाेषणाही या मे अखेरीस हाेण्याची शक्यता अाहे, पण असा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नक्की भाषेसाठी काय करायचे अाहे. शासनस्तरावर काय केले जाते, अशा काही प्रश्नांवर मराठी भाषा समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी काही मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश...
अभिजाततेचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदे हाेणार?
जी भाषा राेजगार देते ती टिकते. उदा. इंग्रजी, मराठीचेही तसेच हाेणार अाहे. मुळातच अभिजाततेच्या दर्जानंतर ती ३००-३५० विद्यापीठांमध्ये शिकवली जाईल. साहित्य, ग्रंथ, प्रकाशक या विश्वाला माेठा हातभार लागेल. मराठी शिकणे, शिकवणे, प्रकाशित करणे, भाषांतर करणे या प्रक्रियांना प्राेत्साहन मिळेल. राज्यातील ५२ बाेलीभाषांचा अभ्यास हाेईल. या सगळ्यामुळे ती ज्ञानभाषा म्हणून विकसित हाेईल. अापण फ्रेंच, जर्मन अशा फाॅरेन लँग्वेज शिकत असताे. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यावर इतर लाेक फाॅरेन लँग्वेज म्हणून तिच्याकडे बघतील.

मग अाता काेणत्या कारणाने घाेषणेला विलंब हाेताेय?
मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत केंद्र पातळीवर सर्व काम पूर्ण झाले अाहे. पण, दुसऱ्या एका भाषेचे अभिजाततेसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने हा विलंब हाेत अाहे. मात्र, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा अाणि इतरांनी न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून मराठीचा मार्ग माेकळा करण्याची विनंती केली अाहे. हा निर्णय या महिनाअखेरीस होणार असून, अभिजात मराठी असे अधिकृतपणे शिक्कामाेर्तब हाेईल, अशी अाशा अाहे.

केंद्राकडून किती निधी मिळेल?
अभिजाततेच्या दर्जानंतर केंद्राकडून दरवर्षी ५०० काेटी रुपये मिळतील. सध्या महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी केवळ २५ काेटी रुपयांची तरतूद केलेली अाहे. ही रक्कम ताेकडी अाहे. त्यात तब्बल २० पटीने वाढ हाेणार अाहे. हे पैसे टप्प्याटप्प्यानेच मिळणार अाहेत. पण, त्यासाठी आपल्याला कामही दाखवावे लागणार. मग केंद्राकडून ते पैसे मिळणार. सध्याची तरतूद ५०० काेटींची अाहे. यात वाढच हाेणार अाहे.

यपैशांचा विनीयाेग कसा होईल?
पाच प्रकारची कामे त्यात प्रामुख्याने अपेक्षित अाहे. त्यात बाेलीभाषांचे संशाेधन, संपादन अाणि संकलन हे महत्त्वाचं काम मानलं गेलं अाहे. अार्ष, अभिजात जे काही ग्रंथ अाहेत ते अापल्याकडे एक लाखाच्या जवळपास अाहेत. अभिजात ग्रंथ म्हणून मान्यता मिळालेली पुस्तके अशा निदान १०० कलाकृती जगातील १०० भाषांमध्ये पाेहाेचवणं यात अपेक्षित अाहे. तेही रास्त किमतीला. अाता अापल्याकडे गाथा सप्तशती अाहे. तिची किंमतच १००० रुपये अाहे. त्यामुळे फार लाेक ती घेत नाहीत. पण, तिची किंमत १०० पर्यंत अाणली तर ती िकतीतरी लाेकांपर्यंत पाेहाेचेल अाणि मराठीचा प्रचार, प्रसार हाेईल. जे िवद्यार्थी, संस्था, अभ्यासक मराठी भाषा, वाचन संस्कृतीचा अभ्यास करणार अाहेत त्यांना शिष्यवृत्ती देणे, यातून संशाेधन पुढे यावं असा उद्देश अाहे. साहित्य संमेलने, काेश निर्मिती यासाठी प्रयत्न करणे अाणि साहित्य संस्था, व्यक्तींना बळ देणं, मराठीकडे लाेकांचा अाेढा वाढेल, अशा वाचनविषयक स्पर्धा, उपक्रम राबविणे अपेक्षित अाहे.

महाराष्ट्र शासनस्तरावर याचं काम कसं चालेल?
खरंतर शासकीय बाबूंच्या हातात हे काम दिलं तर काही खरं नाही. हे लाेकं निर्णय स्वत:च्या हातात ठेवतात अाणि राजकारण्यांचा कल ज्या कृतीने मत मिळेल त्या कृतीकडे असताे. अार्थिकतेबाबत अापण बाेलायला नकाे. अापल्याला काेणत्या भाषेचा द्वेष नाही. पण, उच्च पातळीवरचे सगळे जे नाेकरशहा अाहेत, ते मराठीच्या विराेधात अाणि इंग्रजीचे पुरस्कर्ते अाहेत. त्यामुळे शासनाने मराठी भाषाप्रेमी, सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी, ज्येेष्ठ साहित्यिक, पत्रकार, संशाेधक, अभ्यासक यांच्याकडे हे काम दिले, तरच अभिजाततेचे खरे काम हाेईल असे वाटते. देशातील इतर ज्या अभिजात भाषा अाहेत त्यांचे काम असेच चालते.

महाराष्ट्र शासनाचं मराठीविषयक धाेरण अाणि अभिजात भाषेचा दर्जा याचा संबंध कसा अाहे?
मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा अनंतकाळापर्यंतचा अाहे. मराठीविषयक धाेरणाची अभिजातता ही खूप पुढची गाेष्ट अाहे. धाेरणाला २५ वर्षांची मर्यादा अाहे. त्यात ठरलेल्या गाेष्टीच पूर्ण करायच्या अाहेत. हे धाेरण प्रत्यक्षात अाणण्यासाठी, पुढे नेण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा दिशादर्शक ठरेल, असे म्हणता येइल. तमिळ, तेलगू, कन्नडमध्ये या संदर्भातील उत्तम काम अापल्याला बघायला मिळते.
बातम्या आणखी आहेत...