आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराच्या पाणी नियोजनासाठी पालिकेची आज विशेष महासभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी सोडल्यानंतर गंगापूर धरणातून महापालिकेच्या वाट्याला कागदोपत्री जरी २७०० दशलक्ष घनफूट पाणी दिसत असले, तरी गळती अन्य कारणांमुळे प्रत्यक्षात दोन हजार दशलक्ष घनफूट पाणी मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी जुलैपर्यंत आहे तो पाणीसाठा पुरवून त्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेची विशेष सभा सोमवारी बोलाविण्यात आली आहे. या सभेत तीन दिवसांआड एकदा पाणी बंद निर्णयाची चिन्हे आहेत.

पावसाने ओढ दिल्यानंतर मराठवाड्याने न्यायालयीन लढाई लढवून गंगापूर धरणातील पाण्यावर दावा केला. नाशिकमधील सर्वपक्षीयांच्या विरोधानंतरही मराठवाड्याला गंगापूर धरणातून एक हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. दरम्यान, पाणी सोडण्यापूर्वी नाशिक शहरातील पाण्याबाबत कोणताही विचार झाला नाही. तसेच, विशेष म्हणजे महापालिकेनेही उच्च न्यायालयातील सुनावणीत सहभागी होऊन शहराच्या दृष्टीने पाण्याची गरज दाखवून देण्याची तसदी घेतली नाही. या पार्श्वभूमीवर जुलैपर्यंत काळजीपूर्वक पाणी वापर करण्यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केली होती. त्यानुसार, महापौर अशोक मुर्तडक यांच्या आदेशानुसार सोमवारी पाण्याच्या नियोजनासाठी ही विशेष महासभा होणार आहे.