आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व बदलानुसार शिवसेनेची शैलीही बदलली, उद्धव ठाकरे यांच्यातील नेतृत्वाची छटा बाळासाहेबांच्या उलट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... खणखणीत आवाजातील हे बाळासाहेबांचे उद‌्गार एेकताच असंख्य तरुणांच्या अंगावर राेमांच उभा राहायचा. मनगटाच्या ताकदीने मागण्या मंजूर करणारा त्यांचा शिवसेना पक्ष... बाळासाहेबांच्या निधनानंतर सेनेचे भवितव्य काय, असा प्रश्न चर्चिला जात हाेता. सेनेची सध्या धुरा सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्यातील नेतृत्वाची छटा तशी बाळासाहेबांच्या अगदी उलट. मात्र, तरीही शिवसेनेच्या वैभवात फरक पडलेला दिसत नाही. या दाेन्ही नेतृत्वांचा अनुभव घेतलेली शिवसेना अाता नक्की काेणत्या उंबरठ्यावर उभी अाहे, ज्यांनी शिवसेना साेडली ते सेनेकडे काेणत्या दृष्टीने बघतात, याविषयी ‘दिव्य मराठी’ने काही जुन्या शिवसैनिकांशी चर्चा केली.
शिवसेनेचा श्वास कोंडला
^बाळासाहेबांच्या काळात सेनेत त्यांचाच शब्द अंतिम असायचा. त्यांनी राजकारणात तडजाेड कधी केली नाही. बाेलणे अाणि कृती यांचा नेहमीच ताळमेळ असायचा अाणि ते त्यावर ठामही असायचे. त्यामुळे त्यांचे काम इतरांपेक्षा वेगळे हाेते. बाळासाहेबांविना शिवसेनाच नाही असे सर्वांचे म्हणणे अाहे. ते म्हणजे सेनेचा श्वास हाेते. त्यांच्या जाण्यानंतर हा श्वास कोंडल्यासारखा झाला अाहे. सत्तेत राहण्याची केविलवाणी धडपड नवीन मंडळी करीत अाहेत. याच परिस्थितीत बाळासाहेब असते तर त्यांनी सत्तेला लाथ मारली असती. परिस्थितीशी तडजाेड करता त्यांनी विराेधी बाकावर बसणेच पसंत केले असते. सध्या मात्र तळ्यात-मळ्यात अशी भूमिका नेतृत्वाला घ्यावी लागत अाहे. - राजेंद्र बागुल, माजी जिल्हाप्रमुख

अापुलकीच कमी झाली
^अापुलकी असलेल्या सैनिकांचा पक्ष म्हणून शिवसेनेची अाेळख हाेती. नाशिकचा शिवसैनिक नाशिकराेडला यायचा तेव्हा त्याचा अादरसत्कार केला जात असे. अाता मात्र कुटुंबातील कुणाचे निधन झाले तरीही शिवसैनिक एकत्र येत नाही. थाेडक्यात, शिवसैनिकांमधील पक्षाप्रतिचा काैटुंबिक जिव्हाळा कमी झाला अाहे, असे वाटते. निवडणुकांपर्यंतच नेत्याच्या घरी अाता राबता असताे. पूर्वी नेत्याबराेबर संपूर्ण वेळ शिवसैनिक असायचे. एक मात्र खरे अाहे की, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे संघटन टिकवून ठेवले अाहे. सध्या शिवसेनेची हवा चांगली अाहे. केवळ नियाेजनाअभावी पक्ष मागे पडण्याची भीती वाटते. भाजपमध्ये मात्र चाेख नियाेजन दिसते. - अस्लम (भैया ) मणियार, जुनेशिवसैनिक

सेना ‘स्टाइल’ लयास गेली
^बाळासाहेबांचा अाक्रमकपणा,त्यांची वक्तृत्वशैली, काम करण्याची विशिष्ट पद्धती यामुळे संपूर्ण राज्यावर त्यांचे गारुड हाेते. त्यांचे भाषण म्हणजे शिवसैनिकांशी थेट संवाद असायचा. वक्तृत्वाचा त्यांच्याइतका प्रभाव अाजवर काेणत्याही वक्त्यात दिसत नाही. उद्धव ठाकरे हेदेखील त्यास अपवाद ठरू शकत नाहीत. बाळासाहेबांनंतर शिवसेनेतील अाक्रमकता कमी झाली अाहे. रस्त्यांवर उतरून अांदाेलन करण्याची पद्धतही कमी झाली अाहे. मनगटाने उत्तर देण्याची खास सेना ‘स्टाइल’देखील अाता दिसत नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचेही काही गुण ठळकपणे पुढे येतात. विशेषत: त्यांच्यातील संयमीपणा हा संघटनावाढीस लागण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकताे. - डाॅ. कैलास कमाेद, नाशिकशिवसेनेचे पहिले महानगरप्रमुख