आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाईपरायटरवरील टकटक अखेर थंडावली, आता संगणकावरच होणार कायस्वरूपी परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काॅम्प्युटर, लॅपटाॅप, पामटाॅप, टॅबलेट अशी नित्यनेमाने नवनवीन अद्ययावत रूपे समाेर येत असताना सामान्यांच्या जीवनातून टाईपरायटरवरील टकटक कालाैघात लुप्त हाेत चालली हाेती. मात्र, शासकीय स्तरावर सुरू असलेली ‘टंकलेखना’ची परीक्षा अद्यापपर्यंत टाईपरायटरवरच सुरू हाेती. परंतु, ही टकटकदेखील शनिवारी (दि. १२) कायमची थांबली. टाईपरायटरवरील टंकलेखन परीक्षा काल संपुष्टात अाली असून यापुढील काळात सर्व परीक्षा या संगणकावरच घेतल्या जाणार अाहेत. 
 
टचस्क्रीन देखील मागे पडण्याचा काळ अालेला असतानाच्या काळात अखेरीस टंकलेखनाच्या परीक्षांना पूर्णविराम देण्यात अाला अाहे. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये लिपिक आणि टंकलेखक पदावरील नियुक्तीसाठी टंकलेखन अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असून यापुढे राज्य शासनाकडून संगणकावरील टायपिंगची परीक्षा घेण्याचा निर्णय २०१३ साली घेण्यात अाला हाेता. मात्र, प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी करायला २०१७ साल उजाडले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टंकलेखनाची परीक्षा घेण्यात येत हाेती. आतापर्यंत टायपिंग मशिनवर आधारीत ही परीक्षा अाता कायमस्वरूपी संगणकांवरच घेतली जाणार अाहे. त्यामुळे भविष्यात टाईपरायटर ही एक पुराणकालीन वस्तू म्हणूनच अस्तित्वात राहणार अाहे. राज्याने इ-गव्हर्नन्स धोरण स्वीकारल्याला पंचवार्षिकाहून अधिक कालावधी उलटल्यानंतर संगणकावर टायपिंग परीक्षा अनिवार्य करण्यात अाल्या अाहेत. 
 
नवीन युगाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न 
- टाईपरायटर्स कालबाह्य झाल्याने ते कालाैघात मागे पडणे साहजिक हाेते. भविष्यातील सर्व परीक्षा अाता संगणकावरच हाेणार असून नवीन युगाकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग अाहे.
-दिलीप गाेविंद, सहायक शिक्षण उपसंचालक 
 
वेग राहणार समकक्ष 
टाईपरायटरवरील या अखेरच्या परीक्षेला अाॅगस्टपासून प्रारंभ झाल्यानंतर काल अखेरचा दिवस हाेता. मराठी, इंग्लिश आणि हिंदी या भाषांमधील संगणकावरील टायपिंगच्या अभ्यासक्रमाची पद्धती तीच राहील. संगणकावर टायपिंगचा अभ्यासक्रमदेखील टायपिंगच्या अभ्यासक्रमासमान राहणार असून वेगदेखील समकक्षच राहणार अाहे. 
 
नाशकात १६९३७ परीक्षार्थी 
नाशिक जिल्ह्यात एकूण २१ परीक्षा केंद्र हाेती. त्यात नाशिक महानगरात तर जिल्ह्यात १४ केंद्रांचा समावेश हाेता. नाशिक जिल्ह्यात शनिवारपर्यंत झालेल्या परीक्षेत या सर्व केंद्रांमध्ये मिळून यंदा एकूण १६९३७ परीक्षार्थी सहभागी झाले हाेते. अाता संगणकावरील परीक्षांना १८ अाॅगस्टपासून प्रारंभ हाेणार अाहे.  
बातम्या आणखी आहेत...