आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जातील. अर्थसंकल्पात त्याकरिता विशेष तरतूद केली जाईल, असे आश्वासन महापौर अँड. यतिन वाघ यांनी शनिवारी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले.
नाशिक इंडस्ट्रीज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (निमा) शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. यापूर्वीही महापालिका अधिकार्यांशी या प्रश्नांबाबत चर्चा झाली असून, काही प्रश्न मार्गी लागले असल्याचे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी महापौरांना सांगतानाच गटार, रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण, स्वच्छता, पथदीप, वाहनतळ, पार्किंग आदी समस्यांवर चर्चा झाली.
यांचा होता सहभाग
‘निमा’चे सरचिटणीस मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष नरेंद्र हिरावत, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, व्हिनस वाणी, किरण जैन, अतुल चंपानेरकर, मंगेश काठे आदी.
उद्योजकांनी मांडल्या या समस्या
*औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नसल्याने वाहनांना अपघात घडतात. या रस्त्यांचे तत्काळ डांबरीकरणासह इतर काम होणे गरजेचे आहे.
*रस्त्यांच्या चौफुलीवर वाहतूक बेटे उभारणीकरिता उद्योजक तयार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण करून तत्काळ परवानगी द्यावी.
*सातपूर व अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींत बहुतांश पथदीप बंद आहेत. यापूर्वी अधिकार्यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले; पण समस्या कायम आहे.
*दोन्ही औद्योगिक वसाहतींत प्रत्येक महिन्याला विशेष स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे असून, घंटागाड्यांची संख्याही वाढवावी.
*ड्रेनेज लाइनच नसल्याने मोठी समस्या उभी राहते, त्याकडे महापौरांनी लक्ष घालावे.
*यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार स्वतंत्र शीर्षकाखाली अंदाजपत्रकात तरतूद करावी.
*शहराबाहेर चारही बाजूला ट्रक टर्मिनस उभे करण्यात यावे.
*1200 हेक्टरच्या औद्योगिक वसाहतीत महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, ते उभारण्यात यावेत.
*अंबड गावाजवळील खासगी औद्योगिक वसाहतीत मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
महापौरांनी दिला हा शब्द
*पायाभूत सुविधांकरिता बजेटमध्ये विशेष तरतूद करू.
*दोन्ही औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांच्या कामांकरिता आगामी महासभेत विषय मांडून निधी उपलब्ध करू.
*वाहतूक बेटांकरिता प्रस्ताव द्या, यापूर्वीही सर्वेक्षण केले गेले, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करून तत्काळ निर्णय घेण्याच्या अधिकार्यांना सूचना.
*अंबडकरिता 150, तर सातपूर औद्योगिक वसाहतीकरिता 150 पथदीप बसविण्याची सूचना.
*सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींकरिता आठ-आठ दिवस घंटागाडी देण्याचे आदेश. अतिरिक्त गाड्याही देणार.
*गटारींकरिता एमआयडीसीने आपला वाटा उचलावा, याकरिता उद्योजकांनी पाठपुरावा करावा, महापालिका आपला वाटा उचलेल.
*सीएटजवळील ढासळलेला पूल तत्काळ दुरुस्त करणार.
*रिक्षा थांब्यांबाबत पोलिसांबरोबर औद्योगिक संघटनांनी बैठक घेऊन सर्वेक्षण करून अहवाल द्यावा.
*सातपूर-त्र्यंबक लिंकरोडवर दुभाजक उभारण्यास आणि साइडपट्टय़ा टाकण्यास लगेच सुरुवात करणार.
*पुणेरोडवरील ट्रक टर्मिनसचे काम सुरू, अंबडकरिताही जागा निश्चित करणार.
*त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक उभारणार, एमआयडीसीत रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे काम लगेचच सुरू करणार.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.