आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थात गुन्हे रोखण्यास विशेष पथक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ ध्वजारोहण कार्यक्रमात लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांचे दागिने, वस्तू चोऱ्या झाल्या होत्या. या प्रकारांची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. गर्दीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र पोलिस पथक आणि निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील कर्मचारी चोवीस तास साधुग्राम, रामकुंड परिसरात गस्त घालणार आहेत.
ध्वजारोहण कार्यक्रमात रामकुंड परिसरात पाच भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, बॅग चोरी होण्याचे अनेक प्रकार घडले. पर्वणीकाळात भाविकांची गर्दी होणार आहे. चोरट्यांकडून गर्दीचा फायदा घेतला जाण्याची शक्यता अधिक आहे. राज्यभरातील सराईत चोरटे येण्याची शक्यता असल्याने अशा घटना रोखण्यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी स्वतंत्र पथक निर्माण केले आहे. निर्भया पथकासह महिला कर्मचाऱ्यांचेही स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. पथक चोवीस तास रामकुंड, साधुग्राम भागात गस्तीवर असणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. भाविकांनाही पोलिस प्रशासनाकडून सूचना करण्यात येत आहेत. पर्वणीच्या काळात प्रत्येक भाविकाने ओळखपत्र जवळ बाळगावे, मोजके दागिने अंगावर घालावे, अधिक पैसे सोबत बाळगू नयेत, कमीत कमी वस्तू जवळ बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून भाविकांना करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील एक कर्मचारी आणि क्राईम ब्रँच तिन्ही युनिटच्या कर्मचाऱ्यांची पथकात नियुक्त करण्यात आली आहे.

गुन्हे रोखण्यासाठी नियोजन
पर्वणीच्याकाळ‌ात लाखोंच्या संख्येने भाविक साधू-महंत येणार आहेत. गर्दीचा फायदा घेत चोऱ्यांचे प्रमाण या काळात वाढणार आहे. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे. एस.जगन्नाथन, पोलिस आयुक्त

भाविकांना सूचना
पर्वणीकाळात भाविकांनी अंगावर मोजके दागिने परिधान करावे, मोठ्या बॅगा जवळ बाळगू नयेत, मोजके पैसे जवळ बाळगावे, गर्दीमध्ये अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. संशयास्पद वस्तूंना हात लावू नका, अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा, ओळखपत्र जवळ बाळगा, पोलिसांना सहकार्य करा.
बातम्या आणखी आहेत...