आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करोडो रुपये खर्चाची सामाजिक सभागृहे धूळखात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ नागरिकांसह वॉर्डातील नागरिकांना अल्प दरात सांस्कृतिक कार्यक्रम, अथवा इतर कौटुंबिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पालिकेने करोडो रुपये खर्चून सभागृहे उभारली. विद्यार्थी, तरुणांसाठी अभ्यासिका, व्यायामशाळा उभारल्या. मात्र, यातील बहुतांश वास्तू आजही वापराविना पडून आहेत. काहींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या वास्तूंची अशी अवस्था होण्यामागे मिळकत विभागाचे योग्य धोरणच निश्चित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अशाच वापराविना पडून असलेल्या शहरातील विविध सभागृहांच्या स्थितीवर ‘डी.बी. स्टार’ चमूने टाकलेला हा प्रकाशझोत...
- शहरात किती मिळकती आहेत?
शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून, ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने सध्या मी सांगू शकत नाही.
- मिळकतींबाबत काही धोरण निश्चित करण्यात आले आहे का?
२६,११ पी. एल. दाखल आहेत. हे तुम्हाला चांगले माहीत आहे.
- म्हणजे तुमच्याकडेयाबाबतची माहिती नाही का?
असे कसे, तुम्ही याविषयी खूप बातम्या छापल्या आहेत. उपक्रम घेतले आहेत. तुमचा चांगलाच अभ्यास आहे. हे अंडर प्रोसेस असल्याने मी माहिती सांगू शकत नाही.

शहरातील विविध प्रभागांमध्ये उभारण्यात आलेले सामाजिक सभागृहे सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. कचरा, धूळ, स्वच्छतागृहांची दुरवस्था, खिळखिळीत झालेल्या खिडक्या अशी अवस्था या सभागृहांची झाली आहे. इमारतीच्या भिंतींवर पान आणि गुटखे खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या, तर काही ठिकाणी वापराविना पडून असलेल्या सभागृहाची ‘पुराणी हवेली’सारखी स्थिती झाली आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या या समाजमंदिरांची प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या. या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ चमूने शहरातील काही सभागृहांची पाहणी केल्यावर पालिकेने लाखो रुपयांची उधळपट्टी नेमकी कशासाठी केली असावी, असा प्रश्न उपस्थित होतो.
नागरिकांचे घरगुती कौटुंबिक सोहळे पार पडण्यासाठी तसेच, महिलांना प्रशिक्षण वर्ग घेता यावेत या उदात्त हेतूने नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात सामाजिक सभागृह उभारले आहेत. या सभागृहांची योग्यप्रकारे देखभाल व्हावी म्हणून काही सभागृहे रजिस्टर संस्थांना चालविण्यासाठी देण्यात आली आहेत. तर, काही नगरसेवकांच्या मर्जीतील मंडळांकडे देण्यात आलेली आहेत. संबंधित संस्थांना नाममात्र दराने वास्तू ताब्यात देण्यात आली आहे. मात्र, संबंधित संस्थाचालक नागरिकांकडून कार्यक्रमापोटी अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याच्या तक्रारीही ‘डी.बी. स्टार’कडे आल्या आहेत.
आमदार सीमा हिरे यांची अभ्यासिका ठरली वादग्रस्त
आमदारतथा नगरसेविका सीमा हिरे यांच्या प्रभागात आकाशवाणी येथे अभ्यासिका उभारलेली आहे. या अभ्यासिकेत सुमारे ३०० विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी जात होते. ही अभ्यासिका त्यांच्या मर्जीतील संस्थेला देण्यात आल्याचा जादा पैशांची आकारणी करत असल्याचा आरोप करत एका नागरिकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन याचिका कर्त्याच्या बाजूने निकाल लागल्याने ती अभ्यासिका सध्या वापराविना पडून आहे.
अशोकनगर येथील सभागृहदेखील वापराविना
अशोकनगरयेथे तत्कालीन आमदार नितीन भोसले यांच्या निधीतून सभागृह उभारण्यात आले आहे. हे सभागृहाला मुळात चुकीची जागा निवडाली आहे. फक्त उद‌्घाटन करण्यापुरतेच हे सभागृह उघडण्यात आले होते. त्यानंतर ते बंदच आहे. मग प्रशासनाने हा खर्च कशासाठी केला, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
धोरणाअभावी सभागृह पडून
उंटवाडी येथील सभागृह महिला बचतगटांना चालविण्यासाठी दिले आहे. मात्र, या सभागृहाची देखभाल महापालिकेने करायची अथवा संबंधित संस्थेचे याबाबत कोणत्याच प्रकारचे धोरण निश्चित नसल्याने या सभागृहाची दयनीय अवस्था झाली असून, सध्या ते धूळखात पडून आहे.
गुदाम म्हणून होतोय वापर
प्रभाग क्रमांक ३० मधील काशीमाळी मंगल कार्यालयाजवळील पालिकेच्या मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचा वापर मंडपाचे साहित्य ठेवण्यासाठी होत आहे. या संदर्भात प्रभागाच्या नगरसेविका अर्चना थोरात यांनी पालिका आयुक्त मिळकत व्यवस्थापक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीला महिन्याचा कालावधी उलटला असून, अद्यापही प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, महादेववाडीच्या सभागृहाचे झाले खिंडार...
बातम्या आणखी आहेत...