आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध भावेशने काढलेला फोटो पाहून कॅटरिना थक्क, 1100 अंध व्यक्तींना दिले फोटोग्राफीचे प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंध विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र दाखविताना अंजना तिवारी, व्यासपीठावर पार्थो भौमिक भावेश पटेल. - Divya Marathi
अंध विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र दाखविताना अंजना तिवारी, व्यासपीठावर पार्थो भौमिक भावेश पटेल.
नाशिक - ज्यांना जीवनातील रंग दिसत नाही, निसर्गसौंदर्य त्यांनी कधी पाहिले नाही, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कायम शंका आहे. तेदेखील सुंदर छायाचित्र काढू शकतात हे एेकल्यावर अन् पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसताे. यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे प्रत्यक्षात अाम्ही करून दाखविले अाहे. फुटपाथवर सापडलेल्या मासिकातील ‘अंध व्यक्तीदेखील फोटोग्राफी करू शकतात’ लेख वाचल्यानंतर गेल्या ११ वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्यापासून सुरू केलेल्या फाेटाेग्राफी प्रशिक्षणातून अाज ११०० विद्यार्थी उत्तम फाेटाेग्राफर झाले अाहेत. एवढेच नव्हे तर अंध भावेश पटेलने अभिनेत्री कॅटरिनाचा काढलेला फोटो पाहून तीदेखील थक्क झाली. असे विविध अनुभव मुंबईच्या पार्थो भौमिक यांनी सांगितले.
 
‘दिव्यमराठी’च्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रविवारी दुपारच्या सत्रात पार्थो भौमिक आणि त्यांचा अंध विद्यार्थी भावेश पटेल यांची ‘अ वर्ल्ड ऑफ पॉसिबिलिटीज बाय युझ ऑफ लाइफ’ या विषयावर प्रकट मुलाखत झाली. अंजना तिवारींनी त्यांना बोलते करत त्यांच्या कार्याचा अालेख प्रेक्षकांसमाेर मांडला.
 
पार्थो म्हणाले की, सन २००६ मध्ये मी फ्लोरा फाऊंटन परिसरात फिरत असताना फुटपाथवर एक मासिक सापडले. त्यातील ‘अंध व्यक्तीदेखील फोटोग्राफी करू शकतात’ असा लेख वाचला. तेव्हापासून मी अंध व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे व्रत हाती घेतले. एका विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रशिक्षणाचा उपक्रम आता ११०० अंधांपर्यंत जाऊन पोहाेचला अाहे. ‘जगातील या कलेचा आनंद अंधांनादेखील घेता यावा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा इतरांना प्रोत्साहन देणार आहे,’ असे पार्थो यांनी सांगितले. जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसल्याचे या माध्यमातून पुढे येते. परमेश्वर जेव्हा एखादी शक्ती काढून घेतो तेव्हा दुसरी कुठली तरी शक्ती देतो, ती फक्त ओळखता यायला हवी, असा निष्कर्ष तिवारी यांनी काढला. दैनिक ‘भास्कर डॉट कॉम’चे संपादक अनुज खरे यांनी भावेश पार्थो यांचा सत्कार केला. ऐश्वर्या उखाणे हिने सूत्रसंचालन केले.
 
पुस्तक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
‘अ वर्ल्ड ऑफ पॉसिबिलिटीज बाय युझ ऑफ लाइफ’ हे सत्र संपल्यानंतर अंध छायाचित्रकारांचे पुस्तक पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. या छायाचित्रांच्या पाठीमागचे कष्ट आणि भावना समजून घेतल्यानंतर ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर’ अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
 
एका साबणाच्या कंपनीसाठी टिपला कॅटरिनाचा फाेटाे
मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजचा अंध विद्यार्थी भावेश पटेल याला पार्थो भौमिक यांनी फोटोग्राफी शिकवली. काही दिवसांपूर्वीच भावेशने लक्स साबणाच्या कंपनीसाठी अभिनेत्री कॅटरिना कैफचा फोटो काढला हाेता. हे छायाचित्र पाहून तिलादेखील आश्चर्याचा धक्का बसला. या छायाचित्रानंतर पार्थच्या आग्रहास्तव भावेशला व्यावसायिक फोटोग्राफरसारखे मानधनदेखील मिळाले.
 
पुढील स्‍लाइडवर...स्पर्श, अनुभव, आवाजाच्या आधारे क्लिक हाेताे फोटो
बातम्या आणखी आहेत...