आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रास्ता रोको’नंतर अवघ्या २४ तासांत इंगळेनगर येथे गतिराेधक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - जेलराेडवरील वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे बुधवारी इंगळेनगर चाैकात करण्यात आलेल्या रास्ता राेकाे अांदाेलनाची महापालिका प्रशासनाने दखल घेऊन गुरुवारी (दि. ६) सकाळी चाैकात येण्याजाण्याच्या मार्गावर दाेन ठिकाणी गतिराेधक टाकले आहेत.
जेलराेडवर बिटकाे ते दसकपर्यंत कुठेही सिग्नल, वाहतूक पाेलिस नसल्याने दरराेज अपघात हाेत अाहेत. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालये, करन्सी नाेट प्रेस शासकीय कार्यालय असल्याने विद्यार्थी, प्रेस कामगारांची मोठी वर्दळ असते. आधीच या रस्त्यावर भरणाऱ्या अनधिकृत भाजीबाजारामुळे रुंद रस्ता अरुंद हाेत असून, त्यात अवजड वाहने, रिक्षा भरधाव वेगाने धावत असतात. दाेन दिवसांपूर्वी कारागृह रक्षक मदनलाल माेरे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेने अांदाेलन केले हाेते.

शाळांसमाेर गतिराेधकांची गरज
जेलराेडवर सर्वाधिक शाळा असल्याने पुरुषाेत्तम इंग्लिश स्कूल, सेंट फिलाेमिना, के. एन. केला हायस्कूलसमाेर गतिराेधकांची गरज अाहे. विक्रम खरोटे, सामाजिक कार्यकर्ते