आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेकेदायक, नियमबाह्य गतिराेधकांमुळे नाशिककरांच्या अायुष्यालाच ‘गतिराेध’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेणत्याही रस्त्यावर गतिराेधक उभारण्यासाठी इंडियन राेड सायन्स काँग्रेसच्या (अायअारसी) निकषांची अंमलबजावणी केली जाते. गतिराेधक कसा उभारावा, एकाच रस्त्यांवर दाेन गतिराेधक उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्याची उभारणी कशा पद्धतीने केली पाहिजे, याबाबत अायअारसीने निकष ठरविलेले अाहेत. मात्र, शहरात गतिराेधक उभारताना या नियमांचा कुठेही विचार करण्यात अालेला नाही. अायअारसीने ठरवून दिलेल्या निकषांनुसार उभारण्यात अालेल्या गतिराेधकांचा काहीच फायदा हाेत नसल्याने हे नियम धाब्यावर बसविले जात असल्याची बाब समाेर अाली अाहे. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे आवश्यक आहे. त्याच्या अलीकडे महापालिकेने त्याबाबतचा फलक उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक असल्याची माहिती मिळते. मात्र, शहराच्या विविध भागात पालिकेच्या वतीने अशा प्रकारचे फलकच लावण्यात अाले नसल्याचे दिसून येते.

उंचीतही अाढळते तफावत
राष्ट्रीयमहामार्गावर गतिराेधक नसावेत, असे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले हाेते. मात्र, अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गतिराेधकांची अावश्यकता असल्याने जिल्हा समितीच्या निर्णयानुसार रबलिंग पद्धतीचे गतिराेधक उभारण्यात अाले अाहेत. तरीही काही ठिकाणी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे सूचनांना तिलांजली देण्यात अाली अाहे. गतिराेधक उभारताना त्याची उंची अडीच ते १० सेंटिमीटरपर्यंत असायला हवी. मात्र, या पद्धतीने गतिराेधक उभारल्यास वाहनधारक वाहनाची गती कमी करता अाहे त्याच वेगाने वाहन हाकतात. त्यामुळे अायअारसीच्या निकषांचा उपयाेग हाेत नसल्याची माहिती या क्षेत्राशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर दिली.

वाहनांचे नुकसान अन‌् मणक्यांचे विकारही जडले
मुंबई-अाग्राया राष्ट्रीय महामार्गावर के. के. वाघ महाविद्यालयासमाेर उभारण्यात अालेल्या गतिराेधकांची उंची एखाद्या टेकड्यासारखी करून ठेवल्याने वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत अाहे. गतिराेधकामुळे बसणाऱ्या झटक्यामुळे मणक्यांचे विकार बळावत असल्याने या रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील महिलांना चक्क खाली उतरून गतिराेधक पार करावे लागत असल्याचे चित्र अाहे. चारचाकी वाहनांचा खालचा भागदेखील या गतिराेधकांना घासत असल्याने वाहनांचे नुकसान हाेत अाहे.

तरुणांच्या फिटनेसला अडचणी; महिलांनाही त्रास
नाशिकशहरातदुचाकींचा वापर सर्वाधिक हाेताे. गतिराेधकांच्या धक्क्यांमुळे तरुणांना एेन तारुण्यातच मान कमरेचे विकार जडतात. त्यांच्या फिटनेसचा प्रश्न निर्माण हाेताेय. गर्भवती महिलांनाही गर्भ टिकवून ठेवणे अतिशय कठीण बाब झाली अाहे. या गंभीर परिणामांची त्वरित दखल घ्यावी. डाॅ. नीलेश कुंभारे, अध्यक्ष,पंचवटी मेडिकल असाेसिएशन

अन्य चालकांचे साेडाच, पण नाशिककरांचे राेेजचे मरण
निमाणी,के.के. वाघ अमृतधाम या रस्त्यांवर खूप माेठ्या प्रमाणात अतिरिक्त जाडीचे गतिराेधक उभारले अाहेत. यामुळे दुचाकी, रिक्षा छाेटा हत्ती यांसारखी वाहने बंद पडतात. नेहमीच वाहने एकमेकांवर अादळून अपघात घडतात. एखाद्या दिवशी जाणाऱ्यांचे ठीक अाहे. पण, नाशिककरांचे तर राेजचेच मरण अाहे. - विशाल दवंगे

कायमस्वरूपी उपाययाेजना केल्यास हाेईल समस्यामुक्ती
के.के.वाघ, अमृतधाम हनुमाननगर या तिन्ही चाैफुल्या ठराविक अंतरावर अाल्या अाहेत. विशेषत: या ठिकाणी नेहमीच अपघात घडतात. त्यामुळे येथे गतिराेधक असणे गरजेचेच अाहे. मात्र, सुरक्षित वाहतुकीसाठी कायमस्वरूपी वाहतूक पाेलिसांची नेमणूक करून याेग्य त्या उपाययाेजना कराव्यात. - सुनील सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते

सर्वाेच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन व्हावे
गतिराेधकांबाबतसर्वाेच्चन्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन केल्यास वाहनधारकांची माेठ्या त्रासातून सुटका हाेईल. परंतु, पालिका प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गतिराेधकांबाबत का नियमांचे पालन करत नाही हे अनाकलनीय अाहे. लाेकप्रतिनिधींनीच प्रशासनास उपाययाेजना करण्यास भाग पाडावे. - किशाेर निकम, बांधकाम व्यावसायिक

असे हवेत गतिरोधक
>गतिरोधकाची उंची १० सेंटिमीटर, लांबी ३.५ मीटर वर्तुळाकार क्षेत्र १७ मीटर हवे.
>वाहनचालकाला सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याच्या आधी ४० मीटर अंतरावर सूचना फलक असावा.
>गतिरोधकावर थर्मोप्लास्टिक पेंटच्या पट्ट्या हव्यात.

जेथे गरज तेथेच मात्र अभाव...
शहरात सिंहस्थाच्या निमित्ताने लाखाे रुपये खर्चून रिंगराेड तयार करण्यात अाले अाहेत. चांगले रस्ते असल्याने वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे रिंगराेडवर गतिराेधक बसविणे गरजेचे असताना त्याठिकाणी गतिराेधक नसल्यामुळे अपघातात वाढ झाली अाहे. नवीन बाजार समिती, तारवालानगर, शिवनगर मार्ग परिसरात गतिराेधक नसल्याने गेल्या काही िदवसांत राेज सरासरी एक अपघात हाेत असल्याचे स्थानिक लाेकांचे म्हणणे अाहे. अशीच परिस्थिती अन्य मार्गांची असून, महापालिकेकडे अर्ज करूनही गतिराेधक बसवले गेलेेले नाही.

या परिसरात अाहेत नियमबाह्य गतिराेधक...
पंचवटीतील सेवाकुंज परिसरात सर्वाधिक उंचीचे गतिराेधक उभारले अाहेत. त्याचप्रमाणे डीजीपीनगर येथील मीनाताई ठाकरे शाळेसमाेर, देवळाली कॅम्प रस्त्यावरील मविप्र संस्थेच्या महाविद्यालयासमाेर, मालेगाव स्टॅण्डकडून रामवाडीकडे चिंचबनातून जाणाऱ्या रस्त्यावर तर चक्क वाहन अादळल्यानंतरच तेथे गतिराेधक असल्याची प्रचिती येते. चिंतामणी मंगल कार्यालय चाैफुली येथेही उंच गतिराेधक उभारण्यात अाले अाहेत. भुजबळ फार्म परिसरातदेखील नव्याने तयार करण्यात अालेल्या रस्त्यांवर असे गतिराेधक दिसून येतात.

उंची अन‌् अंतराचे नियम पायदळी...
मुंबई-अाग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी धाेकेदायक अाणि नियमबाह्य गतिराेधक उभारण्यात अाले अाहेत. या गतिराेधकांमुळे वाहने अादळणे, छाेट्या-माेठ्या वाहनांचा ताेल जाणे, अपघात हाेणे हे प्रकार वाढत अाहेत. अनेकदा दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तींना विशेषत: महिलांना सुरक्षिततेसाठी गाडीवरून उतरून चालत हे गतिराेधक पार करावे लागतात, त्याची ही बाेलकी छायाचित्रे.