आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांना ‘वेग नियंत्रक’ अनिवार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व वाहनांची वेगमर्यादा ठरवण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमाच्या पोटनियमात सुधारणा करण्यात आली आहे. विविध वाहनांची ऑक्टोबर २०१५ पूर्वी नोंदणी झालेली असून, त्यांना वेगनियंत्रक बसवलेले नाही आणि जी वाहने केंद्रीय मोटार वाहन नियमात अंतर्भूत होत नाहीत अशा वाहनांना एप्रिलपर्यंत अथवा त्यापूर्वी वेगनियंत्रक बसविण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार एन एम संवर्गात नोंद झालेल्या परिवहन संवर्गात नोंद झालेल्या वाहनांना वेग नियंत्रक बसवण्यापासून सूट दिली आहे. अाॅक्टोबर २०१५ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना वेगनियंत्रक बसविलेले आणि केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्भूत होत नसलेल्या वाहनांना एप्रिल २०१६ किंवा त्यापूर्वी वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार पूर्वनिर्धारित वेगमर्यादेचा वेग नियंत्रक बसविला जाईल, अशी अधिसूचनेनुसार एन म्हणजे मालवाहतूक वाहने आणि ३.४ टनांपेक्षा अधिक नसलेले वाहन एम म्हणजे प्रवासी आणि त्यांचे सामान वाहून नेण्याचे वाहन आणि चालकाच्या आसनाव्यतिरिक्त आठपेक्षा अधिक बसण्याच्या जागा असलेली टनांपेक्षा अधिक नसलेल्या वाहनांना वेगनियंत्रक बसविणे आवश्यक नाही.

असे आहे वेगनियंत्रक
सर्व स्कूल बस- ताशी ४० कि.मी., घातक वस्तू वाहून नेणारी परिवहन संवर्गातील वाहने- ताशी ६० कि.मी., डंपर्स टँकर्स ताशी ६० कि.मी., उपरोक्त १, मध्ये नमूद नसलेली परिवहन संवर्गातील वाहने- ताशी ८० कि.मी.