आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळी, खाद्यतेलाच्या साठेबाजांवर कारवाई, अाठ घाऊक व्यापारी दाेन डाळ मिलवर छापे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- डाळी,तेलबिया आणि खाद्यतेलाचे भाव भडकल्याने राज्य शासनाने साठेबाजांवर कडक कारवाई सुरू केली असून, मंगळवारी कारवाईच्या पहिल्याच िदवशी नाशिकमधील अाठ घाऊक व्यापारी आणि दाेन डाळ मिलवर छापा टाकण्यात अाला. या ठिकाणी तपासणीत प्रमाणातच साठा आढळल्याने या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात अाली नाही. मात्र, आता ही तपासणी सुरूच राहणार असून, जिल्ह्यातील १०२ व्यापाऱ्यांची तपासणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.

शासनाने साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ही समिती ठरवून दिलेल्या साठ्यापेक्षा अधिक साठा घाऊक आणि अर्ध घाऊक व्यापाऱ्यांकडे अाढळल्यास जीवनावश्यक कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहे.
शासनाने डाळी, खाद्य तेलबिया आणि खाद्यतेल यावरील साठा मर्यादा रद्द केल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत तुरडाळीसह सर्वच डाळींचे भाव गेल्या नऊ महिन्यांत शंभर रुपयांपेक्षा अधिक वाढले आहेत. तेलबियांचीही साठवणूक केल्याने तेलाचेही भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने शासनाने या साठवणुकीवर नियंत्रण आणले आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारी झाली.
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार शहरातील सर्व पुरवठा निरीक्षकांचा समावेश असलेले हे पथक धडक कारवाई करणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नियमबाह्य कुठल्याही वस्तूंची साठवणूक करू नये. अन्यथा, जीवनावश्यक कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.