आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports Complex Develops Through Rojgar Hami Yojana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक जिल्हयात रोहयोतून होणार गावपातळीवर क्रीडांगणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जलसंधारण, वनीकरणाबरोबरच रोजगार हमी योजनेतून आता गावपातळीवर क्रीडांगणेही तयार करण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे. प्रत्येक गावात एक या प्रमाणे जवळपास दोन हजार क्रीडांगणे बांधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.


नियोजन विभागाच्या निर्णयाच्या प्रती जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाला प्राप्त झाल्या आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून प्रामुख्याने ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार देणे व त्याबरोबरच सरकारी निधीतून विकासकामे करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेतून शेततळे, पाझरतलाव, कोल्हापूर टाइप बंधारे, जुन्या सिंचन प्रकल्पातील गाळ काढणे, झाडे लावणे आदी वनीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. आता या योजनेचा फायदा लक्षात घेऊन गावपातळीवर सुविधांचे जाळे विस्तृत करण्यासाठी नियोजन विभागाने पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, गोंदिया व गडचिरोलीप्रमाणे राज्यभरात क्रीडांगणांची कामे केली जाणार आहेत. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयातर्फे राबविल्या जाणार्‍या पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान (पायका) योजनेंतर्गत फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, कबड्डी आदी खेळांसाठी उपयुक्त क्रीडांगणाची कामे केली जाणार आहेत.


असे आहे नियोजन
गावातील ग्रामसभेने क्रीडांगणाकरीता ठराव केल्यानंतर वार्षिक कृती आराखडा व लेबर बजेटमध्ये त्याचा समावेश करावा लागेल. तांत्रिक मान्यता जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांची असेल तर प्रशासकीय मान्यता तहसिलदार वा गटविकास अधिकार्‍यांची असणार आहे. या कामांमध्येही 60 टक्के मजुरी व 40 टक्के निधी साहित्यावर खर्च करावा लागणार आहे.