आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा दिन विशेष: ‘दंगल’ साेडून ‘अाशियाई’ अॅथलेटिक्समध्ये देशाला ‘नवसंजीवनी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक जिल्ह्यातील वडाळीभाेई  या छाेट्याशा गावातील एका सामान्य घरातील मुलगी, जी वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत कुस्तीच खेळत हाेती. पण हा मुलींचा खेळ नाही, त्यात पुढे तुला शिकवू शकणारे चांगले प्रशिक्षकदेखील अापल्याकडे नाहीत असे सगळ्यांनीच सांगितल्याने कुस्तीच्या खेळाला विराम देत संजीवनीने मैदानाला जवळ केले. त्यानंतर अवघ्या ९ वर्षांत राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावत तिने थेट ‘अाशियाई  अॅथलेटिक्स’मध्ये ब्राँझ, तर  ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी अॅथलेटिक्स’मध्ये राैप्यपदक पटकावत ‘अाॅलिम्पिक’च्या दिशेने पावले वेगाने टाकायला प्रारंभ केला अाहे.
   
गाव लहान असलं तरी वडील शिक्षक असल्याने ते खूप प्रगल्भ हाेते.  तरुणपणापर्यंत कुस्ती खेळलेली असल्याने त्यांना कुस्तीची अावड हाेती. त्यामुळे  कल पाहून बालपणापासूनच त्यांनी तिला कुस्तीचे धडे द्यायला प्रारंभ केला हाेता. त्यामुळे  सातव्या वर्षापासून कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवण्यास सुरुवात झाली हाेती. वडील व अाईनेदेखील खेळांसाठी नेहमीच प्राेत्साहन दिले.
  
कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवून झाल्यावर सरावासाठी कुणाबराेबर तरी कुस्ती  प्रत्यक्ष लढणे अावश्यक हाेते. गावात कुणीच मुली कुस्ती खेळत नव्हत्या. मग ‘मुलगी’ असल्याने कुस्ती कुणाशी खेळणार, असा प्रश्न संजीवनीच्या वडीलांनादेखील पडला हाेता. त्यामुळे तिच्या माेठ्या भावाबराेबरच ते तिला कुस्ती खेळायला लावायचे. सातवीपर्यंतच्या कुस्ती स्पर्धांमध्ये अाणि धावण्याच्या शालेय शर्यतींमध्ये जिंकत संजीवनीने कुस्ती अाणि धावणे शर्यती अशा दाेन्ही प्रकारात जिल्हास्तरापर्यंत मजल मारली हाेती. त्यानंतर अाठवीत तर तिची  दाेन्ही खेळांमध्ये राज्यस्तरावर निवड झाली. दाेन्ही स्पर्धा एकाच वेळी असल्याने मग काेणता खेळ निवडायचा असा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी कुस्तीचे प्रशिक्षण मुलीला देणारे प्रशिक्षक जिल्ह्यात कुठेच नव्हता. मग निदान अॅथलेटिक्समध्ये प्रचंड नाव असलेले अर्जुन पुरस्कारप्राप्त कविता राऊतचे काेच विजेंद्रसिंह नाशिकला हाेते.  मी धावपटू बनायचे हेच निश्चित केले. ताेच तिच्या अायुष्यातील खरा  ‘टर्निंग पाॅइंट’  ठरला. 

नाशिकचीच धावपटू असलेली कविता राऊत एशियन व काॅमनवेल्थमध्ये पदक मिळवल्याचे समजल्यावर संजीवनीनेदेखील असेच काहीतरी करून दाखवायचे हा ध्यास मनाने घेतला. अखेरीस दहावीची परीक्षा संपताच त्याच दिवशी दुपारी बसने निघून संध्याकाळच्या अात नाशिकला पाेहाेचली. तिथे स्पाेर्ट््स अथाॅरिटी अाॅफ इंडियाचे ‘साई’ काेच  विजेंद्रसिंहंनी तिची चाचणी घेऊन तिला प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली . तिथून खऱ्या अर्थाने धावपटू म्हणून घडण्याच्या संजीवनीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. तिने राज्य स्पर्धांमध्ये ठसा उमटवण्यास प्रारंभ केला. मग अनेक राज्य स्पर्धा जिंकल्या, अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या अाहेत.

अाॅलिम्पिक हेच ध्येय
अनेक अांतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके पटकावताना मी दिलेली वेळ ही अाॅलिम्पिक क्वालिफायपेक्षा केवळ काही सेकंदांनीच कमी अाहे. त्यामुळे जरा अजून मेहनत घेतली अाणि हाय अल्टिट्यूड असलेल्या ठिकाणी काही काळ सराव करायला मिळाला तर ती वेळ गाठणेदेखील मला शक्य अाहे. त्यामुळे अाॅलिम्पिकची पात्रता गाठणे अाणि त्या स्पर्धेतदेखील ठसा उमटवण्याचे  ध्येय ठेवूनच सध्या सराव करीत अाहे.
बातम्या आणखी आहेत...