आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवातून खचून जाता शिकण्याची तयारी ठेवा, पाेलिस उपायुक्त पाटील यांचे खेळाडूंना अावाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुले खेळांमध्ये प्रावीण्य मिळवत अाहेत ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र, कुठल्याही स्पर्धेत पराभूत झालेल्या खेळाडूंनी खचून जाता, यापुढे चांगले परिश्रम घेऊन यश प्राप्त करावे. पराभवातून शिकण्याची तयारी ठेवावी, असे अावाहन पाेलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी खेळाडूंना केले. 
 
नाशिक जिमखान्याच्या वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेनिस, लाॅन टेनिस, बिलियर्ड‌्स, स्नूकर अशा सहा खेळांच्या स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार देऊन गाैरविण्यात अाले. १७ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत हा क्रीडा महोत्सव झाला. त्याच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बाेलत हाेते. याप्रसंगी स्पर्धा आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संयोजकांचा सत्कार अध्यक्ष नरेंद्र छाजेड कार्याध्यक्ष प्रमोद रानडे यांच्या हस्ते करण्यात आला. 
 
सूत्रसंचालन प्रास्ताविक संस्थेचे सचिव राधेश्याम मुंदडा यांनी केले. स्पर्धेचा अहवाल स्पर्धा सचिव शेखर भंडारी यांनी सादर करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमोद रानडे, लक्ष्मीनारायण सिकची, अनिल चुंबळे, मिलिंद जोशी, राजेश भरवीरकर, अलीअसगर आदमजी, झुलकरनैन जागिरदार, संजय मराठे, सुरेश जाधव, योगेश एकबोटे, सतीश पटेल, जयंत कर्पे, श्रद्धा नालमवार, भरत दाभाडे, मंगेश गंभीरे, हर्षल वाल्डे, पंकज खत्री, गौतम क्षत्रिय, अक्षय वाघचौरे आदींसह खेळाडू त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
टेबल टेनिस
{ कॅडेट मुले - कुणाल चाेपडा - निलय पंढरपूरकर 
{ कॅडेट मुली - तनिषा काेटेचा - सायली वाणी 
{ सब ज्यु. मुले - स्वराज कुलकर्णी - चिरायु लुंकड 
{ सब ज्यु. मुली - तनिषा काेटेचा - सायली वाणी 
{ ज्यु. मुले - अर्चित भडकमकर - स्वराज कुलकर्णी 
{ ज्यु. मुली - दीपा भुजबळ - अनुष्का चव्हाण 
{ यूथ मुले - वीरेन पटेल - नुतांशु दायमा 
{ यूथ मुली - दीपा भुजबळ - अनुष्का चव्हाण 
{ खुली एकेरी - वीरेन पटेल - पुनीत देसाई 
{ खुली दुहेरी - वीरेन पटेल - धनंजय बर्वे/ {राजेश भरवीरकर - दिव्येंदु चांदुरकर 
{ वरिष्ठ एकेरी - सतीश पटेल - दिव्येंदु चांदूरकर 
 
बुद्धिबळ 
{ ११ वर्षाखालील गट - पार्श्व टाटीया - क्रिश चाेपडा 
{ १७ वर्षाखालील गट - धनश्री राठी - स्पर्श खंडेलवाल 
{ खुला गट - वरुण वाघ - स्पर्श खंडेलवाल 
 
बिलियर्डस 
{ हॅण्डीकॅप स्नुकर - अरबाज पठाण - राहुल परदेशी 
{ हॅण्डीकॅप बिलियर्ड -वैभव गाडेकर - पंकज खत्री 
अाेपन स्नुकर - पंकज खत्री - अक्षय वाघचाैरे 
{ अाेपन बिलियर्ड - गाैतम क्षत्रिय - पंकज खत्री 
{ हायेस्ट ब्रेक प्राइज - समीर मन्सुरी (स्नुकर ), पंकज खत्री ( बिलियर्ड ) 
 
लाॅन टेनिस 
{ मुली १० वर्षांखालील - श्रेया सावंत - धनश्री पाटील 
{ मुले १० वर्षांखालील - प्रणीत शेट्टी - अंगद काेचर 
{ मुले १२ वर्षांखालील - जैष्णव शिंदे - अाेम सूर्यवंशी 
{ मुली १२ वर्षांखालील - विधी सचदेव - धनश्री पाटील 
{ मुले १४ वर्षांखालील - अाेम पाटाेळे - ऋत्वित सायखेडकर 
{ मुली १४ वर्षांखालील - इशीता शुक्ल - भावना सुंदरम 
{ मुले २० वर्षांखालील - अमाेल जाधव - सिद्धार्थ साबळे 
{ मुली २० वर्षांखालील - लक्ष्मी डाेखळे - इशीता शुक्ल 
 
बॅडमिंटन... 
{मुले एकेरी १० वर्षांखालील - पार्थ देवरे - पार्थ लाेहकरे 
{मुली एकेरी १० वर्षांखालील - समृद्धी भिसे - चारवी कुलकर्णी 
{मुले एकेरी १३ वर्षांखालील - पार्थ देवरे - अंश दुबे 
{मुली एकेरी १३ वर्षांखालील - श्रावणी वालेकर - हेतल विश्वकर्मा 
{मुले एकेरी १५ वर्षांखालील - अमेय खाेंड- शुभम अहिरे 
{मुली एकेरी १५ वर्षांखालील - मिहिका थत्ते - रिया शेट्टी 
{मुली दुहेरी १५ वर्षांखालील - तरल अाखेगावकर -मिहिका थत्ते / रिया शेट्टी - रेणुका श्रीमनवार 
{मुले एकेरी १७ वर्षांखालील - अधीप गुप्ता - अमेय खाेंड 
{मुली एकेरी १७ वर्षांखालील - सई नांदूरकर - शिल्पी पुसदकर 
{मुले एकेरी १९ वर्षांखालील - अमेय खाेंड - अधिप गुप्ता 
{खुल्या एकेरी - अधिप गुप्ता - अक्षय गायधनी 
{मिश्र दुहेरी - विशाखा - विक्रांत करंजकर / सई नांदूरकर - पराग एकांडे 
{वरिष्ठ दुहेरी - पराग एकांडे - याेगेश एकबाेटे / धीरेन तिलवाणी - भ्रमर सेनगर 
 
 
बातम्या आणखी आहेत...