आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वि. वि. करमरकरांना ग्रंथतुलेसह मानाचा मुजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्राचा विकास ही नाळ एकमेकांशी जुळलेली आहे. हातात हात घालूनच ही दोन्ही क्षेत्रे विकास साधू शकतात, असे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना सांगितले. प. सा. नाट्यगृहात रविवारी रंगलेल्या या सोहळ्यात करमरकर यांची ग्रंथतुला करून त्यांना नाशिकमधील सर्व क्रीडा संघटनांच्या वतीने एक लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला.

मराठी क्रीडा पत्रकारितेला खर्‍या अर्थाने ‘मानाचे पान’ मिळवून देणार्‍या या ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर महापौर यतीन वाघ, वनाधिपती विनायकदादा पाटील, महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. करमरकर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व धनादेश देऊन गौरवण्यात आले. नाशकातून चांगले खेळाडू घडण्याची प्रक्रिया मंदावली असल्याने या खंडित परंपरेला पुन्हा एकदा वेग द्यावा लागणार आहे. मला देण्यात आलेला पुरस्काराचा एक लाखाचा निधी मी क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रालाच सर्मपित करू इच्छित असल्याचे करमरकर यांनी या वेळी आयोजित कार्यक्रमात नमूद केले.

शासनाकडून करमरकरांचा सत्कार व्हावा : प्रवीण ठिपसे
नाशिकच्या क्रीडा संघटनांनी मिळून करमरकरांचा सत्कार केला, ते चांगलेच असले तरी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासनाकडूनही त्यांचा सत्कार व्हायला हवा. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे कार्य मोठे आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देणार्‍या समित्यांवर करमरकर आणि त्यांच्यासारख्या नि:स्पृह तसेच अभ्यासू व्यक्तींची नियुक्ती झाल्यास त्या पुरस्कारांमधील घोटाळे थांबण्यास मदत होऊ शकणार असल्याचे महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी सांगितले.