आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 हजार चौरस फुटांत स्पोर्ट्स मॉल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- खेळसाहित्याचे दुकान म्हणजे 500 चौरस फूट जागेतलं. किंवा फार-फार तर एक हजार चौरस फूट जागेवर असेल तर ‘प्रचंड अन् ऐसपैस’ अशीच आपली सामान्य व्याख्या. मात्र, नाशकात तब्बल 20 हजार चौरस फूट जागेवर ‘डिकॅथलॉन’ हा अतिभव्य स्पोर्ट्समॉल साकारत असून, जुलैअखेर हा मॉल विल्होळीत सुरू होणार आहे.
डिकॅथलॉन स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून या अतिभव्य क्रीडादालनाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मूळ फ्रेंच कंपनी असलेल्या डिकॅथलॉनने भारतात आतापर्यंत 12 दालने सुरू केली असून, नाशिक-विल्होळी हे त्यांचे भारतातील तेरावे दालन ठरणार आहे. तब्बल 40 पेक्षा अधिक क्रीडाप्रकारांचे सर्व प्रकारचे साहित्य या एकाच दालनात क्रीडाप्रेमींना उपलब्ध होणार आहे. अद्ययावत दालनासह याच दालनाच्या नजीक पाच हजार चौरस फुटांचे मैदानही साकारणार असून, कोणतेही क्रीडा साहित्य खरेदी करण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष मैदानावर चाचणी घेणेही शक्य होणार आहे. अत्यंत ऐसपैस जागेमुळे दालनात येणार्‍या शहरातील क्रीडाप्रेमींना खेळाची मजा लुटत खरेदीचा भरपूर आनंद घेता येणार आहे.