आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएलएडसाठी स्पाॅट अॅडमिशन १५ जुलैपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विद्यार्थ्यांचा कल डाॅक्टर, इंजिनिअर, कॉम्प्युटर, आर्किटेक्ट याकडे अधिक असून, अध्यापन क्षेत्राकडे ताे कमी झाला अाहे. तरी अजूनही बहुतांश विद्यार्थी डी.एल.एड. (िडप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय प्रवेशप्रक्रिया झाल्यानंतर आता शासकीय कोट्यातून १५ जुलैपासून स्पाॅट अॅडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयातील डी.एल.एड. प्रथम वर्षाचे राज्यस्तरीय (३० टक्के) आणि विभागीयस्तरीय (७० टक्के) प्रवेश राज्यस्तरीय विभागस्तरीय फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सन २०१५-१६ च्या डी.एल.एड.च्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने प्रत्येक जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेला कळविले आहे. त्यामुळे त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील स्पॉट अॅडमिशन प्रक्रिया जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गोवर्धन येथे होणार आहे.

तालुकास्तरीय अध्यापक विद्यालयात अर्ज जमा करा
ज्यासंबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज देण्यासाठी नाशिकला येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय अध्यापक विद्यालयामध्ये अर्ज जमा करावे. मात्र, मुलाखतीच्या वेळेस जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नाशिक येथे यावे लागेल. नितीनबच्छाव, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नाशिक

१५ ते २३ जुलैदरम्यान केली जाणार अर्ज विक्री
डी.एल.एडच्या स्पाॅट अॅडमिशनसाठी प्रवेश अर्ज विक्री स्वीकृती १५ ते २३ जुलैदरम्यान होणार असून, प्रत्यक्ष प्रवेश २२ ते २४ जुलैदरम्यान होणार आहेत. यासाठी राज्यातील कोणत्याही बोर्डाचा विद्यार्थी नाशिक जिल्ह्यात प्रवेश घेऊ शकतो.