आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा प्रथमच ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षेऐवजी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करण्यात अडथळे येत असल्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन विहित मुदतीत वाढ करण्यात आली असून, आता २८ जूनपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे.
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाते. यंदा मात्र शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जुलै-ऑगस्ट २०१५ मध्येच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी शाळांमार्फत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरावयाचे आहेत. या अर्जांची माहिती बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत संबंधित शाळांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे विहित मुदतीत सादर करावयाची आहे.

विहित मुदतीत झाली वाढ
शुल्कप्रकार : माध्यमिक शाळांचे ऑनलाइन अर्ज
नियमित शुल्क : १५ ते २८ जून
विलंब शुल्क : २९ जूननंतर
बातम्या आणखी आहेत...