आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहावीची मार्च, तर बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून धाकधूक असते ती परीक्षेच्या तारखांची. या शैक्षणिक वर्षासाठीचे बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चपासून दहावीची, तर १८ फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

या दोन्ही परीक्षांचे म्हणजेच एसएससी आणि एचएससीच्या तोंडी प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक लेखी परीक्षांच्या काही दिवस आधी जाहीर केले जाणार असल्याचेदेखील सांगण्यात आले. दहावीची परीक्षा ते २२ मार्चला होणार आहे, तर बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान होणार आहे. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पर्यायी विषयांप्रमाणे हे वेळापत्रक पाहायचे आहे. तसेच, भाषाविषयक पर्यायांच्यादेखील तारखा यामध्ये आहेत.

मंडळाच्यासंकेतस्थळावर माहिती : मंडळाच्यासंकेतस्थळावर या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी ते २६ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा झाली. महाराष्ट्रातील ३४३ केंद्रांवर ही झाली होती. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ तयारीसाठी मिळावा, यासाठी वेळापत्रकाची घोषणा महिने आधी केली आहे. निकालाचा टक्का आणखी वाढविण्यासाठी हे प्रयत्न उपयोगास पडतील, असे सांगण्यात येते.