आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाआधीच भितीमुळे विद्यार्थ्‍याची आत्‍महत्‍या, 69 टक्‍के गुणांसह होता पास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहावीचा निकाल लागण्याअाधीच तणावाखाली येत उंटवाडी येथील कौस्तुभ कालिदास मुनडेगकर या विद्यार्थ्याने रविवारी रात्री आत्महत्या केली हाेती.
 
मंगळवारी लागलेल्या निकालात काैस्तुभला दहावीत ६९ टक्के गुण मिळाल्याचे स्पष्ट  झाले. मात्र, हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी तो या जगात नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.    अभ्यासात हुशार असलेला कौस्तुभ आई-वडिलांचा लाडका होता. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण अापल्याला मिळतील की नाही, याची त्याला चिंता हाेती. त्यामुळे ताे तणावाखाली हाेता.  याच तणावातून रविवारी रात्री आई-वडील झोपल्यानंतर त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, जळगावात नापास विद्यार्थ्‍याची आत्‍महत्‍या...
बातम्या आणखी आहेत...