आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • St. Francis School Issue At Nashik, Divya Marahti

‘सेंट फ्रान्सिस’वर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या शुल्कवाढीविरोधात पालक संघटनेच्या आंदोलनामुळे व आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. इंदिरानगर पोलिसांनी पालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा गुन्हा दाखल केला. यामुळे शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

दोनशे पालकांनी शाळेत जमा होत थेट इंदिरानगर पोलिस ठाणे गाठले. पालक संघटनेने सहायक पोलिस आयुक्त हेमराजसिंग राजपूत व वरिष्ठ निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. या वेळी संजय पाटील, सचिन मालेगावकर, व्ही. एल. सोनवणे, साहेबराव आव्हाड, तुषार घोलप, महेश कुशारे, सतीश पाटील, अँड. खांडबहाले, योगेश जाधव आदी उपस्थित होते.
अशी आहे तक्रार
खासगी शाळांनी शुल्कवाढ करताना शिक्षणाधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, शाळेने ती घेतलेली नाही. तसेच, पालकांना विश्वासात घेतलेले नाही. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याने संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेने मनमानी थांबवावी
शाळा प्रशासनाची पूर्णपणे मनमानी सुरू आहे. पालकांना विश्वासात घेतले जात नाही. मुलांनाही शाळेत चांगली वागणूक मिळत नाही. तुमचे पालक आंदोलन करून शाळेची बदनामी करतात, असे म्हटले जाते. कविता जगताप, पालक

शुल्कवाढ बेकायदाच
शाळेने केलेली शुल्कवाढ बेकायदेशीर आहे. यापुढे पालक संघटना शांत बसणार नाही. त्यासाठी कायदेशीर लढाई लढू. अँड. सुवर्णा सोनवणे, पालक
इंदिरानगर पोलिस ठाण्यात सेंट फ्रान्सिस शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले संतप्त पालक.